शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचा काळाबाजार थांबविण्याची मागणी; प्लाझ्मादानाकरिता आवाहन करण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 23:31 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्लाझ्मादानाकरिता आवाहन करण्याची सूचना

उल्हासनगर : रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी व मर्यादित पुरवठ्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होत असून त्याला आळा घालण्याची मागणी उल्हासनगरवासीयांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

शहरातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे, महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयाची इंजेक्शनची एकूण मागणी महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय मान्यताप्राप्त मेडिकलच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणार, असे ठरले. तसेच रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना चिठ्ठी देऊन इंजेक्शनची मागणी करण्यास मनाई केली. असे असतांना सर्वच कोविड रुग्णालय रुग्णांच्या नातेवाईकांना चिठ्ठी देऊन सर्रास हे इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत आहेत. 

मनसे अध्यक्ष बंडू देशमुख, ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे अध्यक्ष राज असोडकर, प्रहार जनशक्तीचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील, समाजसेवक  शिवाजी रगडे आदींनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे मान्य करीत, राज्याला लवकरच इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. सध्या प्लाझ्मा हा कोविड रुग्ण बरे होण्यासाठी संजीवनी ठरत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकाला प्लाझ्मा आणण्यास सांगत आहेत. यातून प्लाझ्मा डोनर भेटणे हे अवघड होऊन बसल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मादान करण्याकरिता शासनाकडून जनजागृती करावी, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरthaneठाणे