शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी

By admin | Updated: January 11, 2017 07:06 IST

माणगाव येथील शेतकरी रमेश भोईर यांनी केलेल्या बेकायदा इमारतीवर कारवाई टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) कल्याण विभागातील सहायक नियंत्रक मु.रा. पवार

डोंबिवली : माणगाव येथील शेतकरी रमेश भोईर यांनी केलेल्या बेकायदा इमारतीवर कारवाई टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) कल्याण विभागातील सहायक नियंत्रक मु.रा. पवार यांनी पैशांची मागणी केली होती. मात्र, ती पूर्ण न करू शकल्याने त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे पवार हेच भोईर यांच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन संघर्ष समितीने मानपाडा पोलीस ठाण्यास दिले आहे. दरम्यान, पवार यांनी हे आरोप फेटाळले आहेत.माणगाव येथील सर्व्हे नं. ६६, हिस्सा नंबर १ या जमिनीवर भोईर यांनी एक इमारत बांधली. परंतु, हे बांधकाम बेकायदा असल्याची नोटीस २६ डिसेंबर २०१६ ला पवार यांनी भोईर यांना पाठवली. भोईर यांनी बांधकाम करताना ग्रा.पं.कडून सर्व परवानग्या घेतल्या होत्या. तसेच ती स्वत:च्या जागेवर बांधली होती. मात्र, ते बांधकाम एमएमआरडीएने बेकायदा ठरवले. तसेच त्या वेळी कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना आ. सुभाष भोईर व सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध करू न कारवाई पुढे ढकलली. तसेच एमएमआरडीए अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर, पुढील निर्णय होईपर्यंत बांधकाम तोडू नये, अशी मागणी केली. मात्र, पुन्हा २ जानेवारीला एमएमआरडीएने नोटीस बजावून कारवाई करणार असल्याचे सांगितले. पवार यांनी बांधकामावर कारवाई न करण्यासाठी भोईर यांच्याकडे अवास्तव पैशांची मागणी केली. आपण पैसे न दिल्यास इमारत तोडली जाईल, या भीतीने भोईर रात्रभर झोपले नाहीत. त्यात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पवार हेच भोईर यांच्या मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संघर्ष समितीने केली. (प्रतिनिधी)