शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन रूपी क्लिनिक सुरू करण्याची मागणी; मनसेच्या माजी नगरसेवकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:56 IST

माजी नगरसेवकाचे आयुक्तांना निवेदन : हरकिसनदास रुग्णालयाचा दिला प्रस्ताव

कल्याण : पूर्वेतील केडीएमसीच्या हरकिसनदास रुग्णालयात वन रूपी क्लिनिक सुरू करा, अशी मागणी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्तांनी निवेदन स्वीकारून ही सेवा सुरू करण्याबाबत त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हरकिसनदास रुग्णालय शहराच्या पूर्वेला स्टेशनजवळील गणेशवाडीत आहे. या रुग्णालयाच्या इमारतीत सात गाळे वापराविना पडून आहे. तेथे २४ तास चालणारे जेनरिक मेडिकल स्टोअर्स, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी, एक्सरे आणि प्रसूतिगृह सुरू करता येऊ शकतो, याकडे निकम यांनी लक्ष वेधले आहे. रेल्वेस्थानकाप्रमाणे पूर्वेतील हरकिसनदास रुग्णालयात वन रूपी क्लिनिक सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निकम यांनी भेट घेतली होती. तसेच भाजपच्या नगरसेविका सुमन निकम यांनीही यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. वन रूपी क्लिनिकच्या प्रमुखासोबत चर्चा केल्यावर आयुक्तांनी जागेची पाहणी केली होती.

दरम्यान, महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयात योग्य प्रकारे आरोग्यसेवा मिळत नाही, अशी नागरिकांची ओरड असते. नगरसेवकांनीही त्याला दुजोरा दिला आहे. तर, हरकिसनदास रुग्णालय वरील दोन रुग्णालयांपेक्षा लहान आहे. डोंबिवलीतील सूतिकागृहाची नवी इमारत बांधणे प्रस्तावित आहे.शास्त्रीनगर रुग्णालयात विविध व अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी पीपी तत्त्वावर क्रेष्णा कंपनीला काम दिले आहे. केंद्र सरकारने ठरवलेल्या दरानुसार ही कंपनी रुग्णांना आजाराच्या निदानाच्या सेवा पुरविणार आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. ‘रुक्मिणीबाई’मध्येही पीपी तत्त्वावर सेवा सुरू करणे प्रस्तावित आहे. तसा प्रस्ताव हरकिसनदास रुग्णालयासाठी देखील केला जावा, अशी अपेक्षाही निकम यांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्याआधी तेथे ‘वन रूपी’ सुरू करण्याची त्यांची मागणी आहे.