शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

विठोबारूपी गणेशमूर्तींना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:57 IST

एखादी मालिका किंवा सिनेमातील गाजलेल्या भूमिकेच्या रूपातील गणेशमूर्ती बनवण्याचे फॅड गेल्या काही वर्षांपासून वाढल्याने यंदा ‘विठुमाऊली’ मालिकेच्या प्रभावामुळे विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : एखादी मालिका किंवा सिनेमातील गाजलेल्या भूमिकेच्या रूपातील गणेशमूर्ती बनवण्याचे फॅड गेल्या काही वर्षांपासून वाढल्याने यंदा ‘विठुमाऊली’ मालिकेच्या प्रभावामुळे विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. यापूर्वी ‘जय मल्हार’, ‘बाहुबली’, ‘बाजीराव’ यांच्या रूपांतील गणेशमूर्तींनी ठाणेकरांवर गारूड केले होते. सध्या गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू असून विठ्ठलरूपातील मूर्ती साकारण्यात मूर्तिकार गुंतले आहेत. वारकऱ्यांनीही याच मूर्तींना पसंती दिली आहे.विठोबारूपी २२ मूर्तींचे बुकिंग झाले असून बुकिंग करणाºयांमध्ये सहा ते सात वारकºयांचा समावेश असल्याचे मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सव्वादोन फुटांपासून सात फुटांपर्यंत या मूर्ती बनवल्या जात असून त्यांची किंमत सव्वातीन, साडेतीन हजारांपासून २८ हजार रुपयांपर्यंत आहे. विठोबाच्या रूपातील मूर्तींपाठोपाठ श्री स्वामी समर्थांच्या रूपातील गणेशमूर्तींनादेखील मागणी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, टिटवाळा चिंतामणी, सिंहासनावर आरूढ झालेला, पगडीतील गणेशमूर्तींनाही मागणी आहे.>जीएसटीचा परिणाम मूर्तींच्या दरांवरदेशभरात लागू असलेला जीएसटी, कामगारांचे वाढलेले पगार, रंगांचे व पीओपीचे वाढलेले दर यामुळे यंदा मूर्तींच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सव्वा फुटाची मूर्ती १५०० रुपयांना विकली होती. यंदा याच मूर्तींचे दर १७०० रुपये आहेत. मूर्तींचे दर वाढले आहेत. गणेशभक्तांना महागड्या दराने मूर्ती विकणे हे आम्हाला पटत नसले, तरी नाइलाजाने विकावे लागते, असे बोरीटकर यांनी सांगितले.<आता रंगकामास सुरुवातदोन महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने आता जवळपास मूर्ती बनवण्याचे काम संपले असून रंगकामास सुरुवात झाली आहे. पावसाचा अंदाज घेऊन कामाचा वेग वाढवला जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.