शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 03:02 IST

केडीएमसीने फेरीवाल्यांचे केलेले सर्वेक्षण हे न्यायालयाच्या आदेशाशी विसंगत आहे. त्यामुळे ते सर्वेक्षण रद्द करावे, अशी मागणी कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियन डोंबिवली आणि महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी केली आहे.

मुरलीधर भवारकल्याण : केडीएमसीने फेरीवाल्यांचे केलेले सर्वेक्षण हे न्यायालयाच्या आदेशाशी विसंगत आहे. त्यामुळे ते सर्वेक्षण रद्द करावे, अशी मागणी कष्टकरी हॉकर्स व भाजीविक्रेता युनियन डोंबिवली आणि महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी केली आहे. दरम्यान, फेरीवाल्यांच्या मागण्यांसंदर्भात ६ फेब्रुवारीला आयुक्तांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर, महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सरखोत यांनी दिली.सरखोत यांनी सांगितले की, महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण जीआयएस पद्धती प्रणालीच्या आधारे केलेले नाही. फेरीवाल्याचा फोटो हा तो व्यवसाय करत असलेल्या जागेसह अपलोड केला पाहिजे. त्याचे आधारकार्ड त्या सर्वेक्षणाशी लिंक केले पाहिजे. या गोष्टींचा समावेश न करता केलेले सर्वेक्षण राज्य सरकारच्या अ‍ॅप्समध्ये अपलोड होत नाही. महापालिकेने प्रत्येक फेरीवाल्याकडून सर्वेक्षणासाठी १०० रुपये घेतले. प्रत्यक्षात सर्वेक्षण मोफत करण्याचे आदेश होते. सर्वेक्षणासाठी सरकारकडून महापालिकेस १९ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी एक लाख ८४ हजारांचा निधीही मिळाला आहे. त्यातून जीआयएस पद्धतीने सर्वेक्षण झाले पाहिजे. तसेच १०० रुपये फेरीवाल्यांना परत केले पाहिजेत. २७ गावांमधील फेरीवाल्यांचे खाजगी संस्थेने केलेले सर्वेक्षण रद्द करावे. कारण, सर्वेक्षणाचा अधिकार केवळ शहर फेरीवाला समितीला आहे. समितीचा अधिकार डावलून आयुक्तांनी बेकायदा सर्वेक्षण केले आहे.उच्च न्यायालयाच्या १ नोव्हेंबर २०१७ च्या आदेशानुसार शहर फेरीवाला समिती ६० आठवड्यांत स्थापन करणे आवश्यक होते. शहर फेरीवाला समिती स्थापन करण्याबाबत महापालिका संभ्रमात आहे. महापालिकेने न्यायालयाच्या निकालापूर्वीच ही समिती नेमली आहे. त्यामुळे ती पुनर्जीवित करावी की, नव्याने समिती स्थापन करावी, याविषयी प्रशासनाने २० जानेवारीला विधी विभागाकडून सल्ला मागितला आहे. मात्र, हा अभिप्राय अजूनही महापालिका प्रशासनास प्राप्त झालेला नाही. महापालिकेने न्यायालयाचा अवमान केला आहे. मात्र, त्याप्रकरणी फेरीवाला संघटनेने नोटीस बजावलेली नाही.>फेरीवाला क्षेत्रात व्यवसायास परवानगी द्यामहापालिकेने २०११ मध्ये ठराव मंजूर करून फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र घोषित केले. या फेरीवाला क्षेत्रात विस्थापित झालेल्या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी सरखोत यांनी केली आहे.त्याचा निर्णयही शहर फेरीवाला समिती घेईल, असे प्रशासनाने सांगितले.