शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: July 20, 2015 03:17 IST

येथील दक्ष बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्यावरील अत्याचारांचे फोटो काढणाऱ्या व ते व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कसारा ग्रामस्थांकडून होत आहे.

कसारा : येथील दक्ष बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्यावरील अत्याचारांचे फोटो काढणाऱ्या व ते व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कसारा ग्रामस्थांकडून होत आहे.एकीकडे एक चिमुरडा नरकयातना भोगत असल्याने ही घटना जवळच्या पोलीस ठाण्यात कळविणे बंधनकारक असताना तसे न करता केवळ मोबाइलचित्रण करून या महाभागांकडून दक्षवर होणाऱ्या अत्याचारांवर समर्थन देण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याच्यावर होत असलेल्या अत्याचारांबाबत नातेवाईक व आसपासचे रहिवासी गप्प का होते, असा सवाल उपस्थित झाला असून जर त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारांबाबत संबंधित पोलिसांना माहिती दिली असती तर आज दक्ष बेपत्ता होण्यापासून वाचला असता. एकीकडे दक्षवर त्याच्या सावत्र आईकडून व सख्ख्या बापाकडून होणाऱ्या अत्याचारांचे मोबाइल चित्रण करणारे लताचे नातेवाईक व इतर रहिवासी गम्मत पाहत होते, तर दुसरीकडे तो मदतीची अपेक्षा करीत एखाद्या देवदूताची वाट पाहत अत्याचार सहन करीत बसला असावा. ‘पास्को’ कायद्याखाली होऊ शकते अटकबेपत्ता झाल्यानंतर ज्यांनी त्याचे अत्याचारित फोटो प्रसिद्धिमाध्यमे, पोलीस ठाणे, व्हॉट्सअ‍ॅपवर प्रसारित केले, त्याच्यावर अत्याचार होत असताना त्याचे फोटो काढून या अत्याचाराची माहिती पोलिसांना न देणाऱ्या या महाभागांवर पास्को कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी कसाऱ्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. जून २०१२ मध्ये पास्को हा नवा कायदा अमलात आला आहे. लहान मुलांवर अत्याचार, छळ होत असताना ते डोळ्यांनी बघत असतानादेखील ती माहिती वेळीच पोलिसांना न कळविल्याप्रकरणी त्या व्यक्तीला पास्को कायद्याखाली अटक करण्यात येऊ शकते. त्या कलमान्वये अत्याचारित, पीडित दक्षचे मोबाइल फोटो काढणाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरत आहे.(वार्ताहर)