शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सृजनात्मक खडूशिल्पाचा नाजूक छंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 00:30 IST

खडूचा उपयोग काय? असं विचारलं तर सर्वसामान्य माणूस फळ्यावर लिहायला, असं सांगेल.

-अभय फाटक

खडूचा उपयोग काय? असं विचारलं तर सर्वसामान्य माणूस फळ्यावर लिहायला, असं सांगेल. पण, हाच खडू जर एखाद्या सृजन कलाकाराच्या हातात पडला, तर तयार होतं नाजूक हाताने केलेलं खडूशिल्प. शशिधर पांढारकर हे पेशाने इंजिनीअर, पण मनाने कलाकार. ठिसूळ खडूंवर कोरीवकाम करून शशिधर यांनी साकारलेल्या कलाकृती पाहून थक्क व्हायला होतं. इतकंच काय तर दृष्ट लागू नये म्हणून मिरची, लिंबू आणि कोळसा एका तारेत बांधून ठेवण्याची पद्धत आहे. ते सुद्धा खडूमध्ये साकारलं आहे आणि त्याला रंगवलं आहे. घरच्या गणपतीचं मखर दरवर्षी स्वत: बनवताना वेगवेगळे आकृतीबंध त्यांनी साकारले. कधी काडेपेटीच्या काड्यांचा एफेल टॉवर तर कधी सिल्कचा धागा आणि पेपरट्युबपासून केलेला दादर-वरळी सी लिंक.

शशिधर यांनी एफेल टॉवरसाठी २५ दिवस तर सी लिंकसाठी आठ दिवस मेहनत घेतली. खयाखेरीज, मेक इन इंडियाचं शिल्प बनवलं. कधी पाण्याचं पडद्यासारखं कारंजं बनवलं, तर कधी गणपती आणि कार्तिकेयाचा पृथ्वी प्रदक्षिणा करणारा चालणारा देखावा उभा केला. दरवर्षी वाढदिवसाला बाबांकडून हटके ग्रीटिंगकार्ड पाहिजे, हा शशिधर यांनी आपल्या मुलीचा हट्ट वेगवेगळ्या प्रकारची काडर््स बनवून पुरा केला. काळाघोडा कला उत्सवामध्ये स्ट्रिंग आर्ट आणि बुक फोल्डिंग म्हणजे पुस्तकाची आतली, पण घडी करून अर्थपूर्ण आकार करण्याची कला आत्मसात केली. स्ट्रिंग आर्टचे मिनिएचर म्हणजे छोट्या आकाराची पाकिटं (एन्व्हेलप) तयार केले.

आहेर देताना हीच पाकिटे वापरायला सुरुवात केली, जी लोकांना खूप आवडली आणि कौतुक झालं. बुक फोल्डिंग मात्र सोपं नव्हतं, कारण तयार केलेली कलाकृती फक्त बघितली होती. कसं करायचं हे माहीत नव्हतं आणि कसं करायचं हे सांगणारं कोणी नव्हतं. घरी परत जाताना खूप विचार केला आणि एका पुस्तकावर प्रयोग केला. सुरुवातीला सोपा प्रकार करून बघितला. तो जमल्यावर हुरूप आला आणि आता कठीण कलाकृती शशिधर सहजपणे करतात. रेल्वेतून निवृत्त झाल्यावर अनेक छंद जोपासायला सुरुवात केली. कलाकार आणि संग्राहकांशी जोडण्याचा प्रयत्न केला. शशिधर ओरिगामी, क्तिवलिंग, वारली चित्रकला शिकले. शशिधर यांच्या छंदांच्या या प्रवासात त्यांना अरविंद कुलकर्णी आणि आनंद भावे यांचं मार्गदर्शन मिळालं. अनेक प्रदर्शनात भाग घेतला.

केवळ एवढे करून शशिधर थांबले नाहीत. निवृत्त होण्याआधी काही वर्षे नाणी जमवायला सुरुवात केली. भारतातील आणि परदेशांतील नाणी यांच्या संग्रहात आहेत. विदेशी नाण्यांबद्दल माहिती गोळा करणे, त्या देशाच्या करन्सीचा अभ्यास सध्या सुरू आहे. भारतीय नाण्यांमध्ये शशिधर यांच्याकडे पाच रुपयांची ४५ प्रकारची नाणी आहेत आणि २०, ५०, ६०, ७५, १००, १२०, ५००, १००० रुपयांची नाणी यांच्या संग्रहात आहेत.

काडेपेटीचा छंद खरंतर स्वस्तात मस्त म्हणून जोपासला. काडेपेटीमध्ये खूप विविधता आहे. पशू, पक्षी, प्राणी, पाने, फळे, फुले, रोजच्या वापरातील वस्तू अशा वेगवेगळ्या २५०० काडेपेट्या शशिधर यांच्या संग्रहात आहेत. यापुढे शशिधर यांना केरिकेचर (अर्कचित्र), टेराकोटा पॉटरी व पेपर स्कल्पचर शिकायची इच्छा आहे. त्यांच्या छंदाच्या या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.(लेखक संग्राहक असून द हॉबी सर्कलचे संस्थापक आहेत.)खडू हाती आला की, आपण सामान्यपणे फळा किंवा पाटीवर लिहू लागतो. पण, तोच खडू जर एखाद्या सृजनात्मक कलाकाराच्या हाती पडला तर... खडूत कोरीवकाम करून अशाच अफलातून कलाकृती निर्माण करण्याचा छंद जडला आहे, तो शशिधर पांढारकर यांना. पेशाने इंजिनीअर असलेले शशिधर यांनी खडूमध्ये कोरीवकाम करून बुद्धिबळाची तयार केलेली प्यादी तसेच पेपरट्युबपासून केलेला वांद्रे-वरळी सी लिंक आकर्षक आहेत. त्यांनी ओरिगामी, क्तिवलिंग, वारली चित्रकला, कॅलिग्राफी, पारचमेंट पेपर आर्ट, त्रिमिती चित्रकला आदी कला जोपासल्या असून त्यांनी काडेपेट्या, नाणी यांचा संग्रहदेखील केलेला आहे.

टॅग्स :thaneठाणे