शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सहावीच्या पुस्तकांना विलंब

By admin | Updated: June 15, 2016 02:26 IST

सहावीेचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलल्यामुळे पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध झालेली नाहीत. मराठी माध्यमाची सर्व पुस्तके आली असली तरी इंग्रजी माध्यमाचे इतिहासाचे पुस्तक अद्याप आलेले

ठाणे : सहावीेचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलल्यामुळे पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध झालेली नाहीत. मराठी माध्यमाची सर्व पुस्तके आली असली तरी इंग्रजी माध्यमाचे इतिहासाचे पुस्तक अद्याप आलेले नाही. इंग्रजी - बालभारतीचे पुस्तकही शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी दुकानांत उपलब्ध झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जून महिना उजाडला की, शाळांच्या खरेदीची लगबग सुरू होते. अनेक जण गर्दी टाळण्यासाठी दहा, पंधरा दिवस आधीच खरेदी करतात. तर काही शाळा सुरू होण्याच्या एक ते दोन दिवस अगोदर खरेदी करणे पसंत करतात. बुधवारपासून सर्वत्र शाळा सुरू होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील ठिकठिकाणी वह्या - पुस्तक विक्रेत्यांकडे खरेदीची लगबग दिसून आली. सायंकाळी तर हा गर्दीचा महापूर ओसंडून वाहत होता. परंतु, काही पुस्तके वेळेत येतात तर काही पुस्तकांना विलंब लागतो हा नेहमीचाच अनुभव विद्यार्थी आणि पालकांना यंदाही आला. मार्च महिन्यापासून दुकानांत पुस्तके येण्यास सुरूवात होतात. मे महिन्यापर्यंत सर्वच पुस्तके आलेली असतात. यावर्षी मात्र, सहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने त्याची पाठ्यपुस्तके १५ दिवसांपूर्वी दुकानांत येण्यास सुरूवात झाली. मराठी माध्यमांची सर्व पुस्तके आली असली तरी इंग्रजी माध्यमांची पुस्तके मात्र, हळूहळू येत आहेत. इतिहासाचे पुस्तक आता बाकी असून ते एक ते दोन दिवसांत येईल, असे पुस्तक विक्रेते कुणाल विकम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सहावीच्या पाठ्यपुस्तकांबरोबरच गाईडला उशीर झाला आहे. इंग्रजी माध्यमाची सर्वच विषयांची गाईडस् बाकी असून मराठी माध्यमाच्या चार विषयांची गाईडस् येणे बाकी आहे. एक ते दोन आठवड्यांत उर्वरित विषयांचे येतील, असे विकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)