शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वाचक कट्टयावर रंगली काव्य दीपावलीची मैफिल, रसिकांना मिळाला कवितांचा फराळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:37 IST

ठाण्यातील वाचक कट्ट्यावरील प्रेक्षकांना दीपावली निमित्त काव्य मैफिलीतून रसिकांना कवितांचा फराळ मिळाला. 

ठळक मुद्देवाचक कट्टयावर रंगली काव्य दीपावलीची मैफिलरसिकांना मिळाला कवितांचा फराळ माणसाला माणूस म्हणून वागणूक द्यावी - नाकती

ठाणे : अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी आली असून घरोघरी फराळ बनवायला सुरवात झाली आहे. पण हा फराळ जरा वेगळा आहे.या फराळात कविता ऐकण्यास मिळाल्या. वाचक कट्टयावर काव्य दीपावली अर्थात दिवाळीचा काव्यात्मक फराळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा हा २२ क्रं चा वाचक कट्टा होता.यावेळी रसिक प्रेक्षकांची गर्दी जमली होती.

    यावेळी वाचक कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी पूल देशपांडे लिखित "भरलेला खिसा" हि वास्तववादी कविता सादर केली. जीवन जगत असताना आर्थिक निकष कसे महत्वाचे ठरतात, माणसे परिस्तिथीनुसार कशी बदलतात तसेच या सर्वात मैत्री हीच अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत टिकते असे या कवितेत सांगण्यात आले. विं.दा. करंदीकर लिखित "आयुष्याला द्यावे उत्तर" या कवितेतून जीवनाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन आणि वागण्यातला निर्भीडपणा मांडण्यात आले. "बायको जेव्हा बोलत असते" या कवितेच्या माध्यमातून समस्त पुरुष जातीच्या वेदना विनोदी ढंगाने मांडण्यात आल्या. "कणा" हि कविता यावेळी खास आकर्षण ठरली, आपल्या कढील सर्व काही उध्वस्त झालेले असताना देखील जगण्याची नवी उमेद देणारी कविता म्हणजे कणा होय.अनेक समस्यांना सामोरं जात इथपर्यंतचा आपला खडतर प्रवास नाकती यांनी या कवितेच्या साहाय्याने मांडला. साध्याच्या वास्तवावर प्रखरपणे भाष्य करणारी "लाल रंग" ही स्वलिखित कविता सादर करत माणुसकीच्या बोथट झालेल्या भिंती व माणसांचे बदलते चेहरे यावर भाष्य करण्यात आले.एखाद्या अपघाताच्या वेळी रुग्णाला रक्त देताना आपण जात पाहतो का? मग इतर वेळी का आपण वेगवेगळ्या रंगात विभागले गेलो अहोत? असा प्रश्न या सादरीकरणातून विचारण्यात आला.  माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली तरच एकमेकांतिल अंतर व समाजातील जातीपातीच्या भिंती नष्ट होतील व सर्वधर्म समभाव ही भावना रुजू होईल असे नाकती म्हणाले. यावेळी साधना ठाकूर,गौरी ठाकूर यांनी गुलजार जिच्या कविता सादर केल्या.शुभांगी भालेकर यांनी पाणी व प्राणी,सहदेव कोळंबकर याने असा असावा तो,कुंदन भोसले याने दिवाळीच्या कविता,मौसमी घाणेकर यांनी काव्यांजली,रोशनी उंबरसाडे हीने कालयुग इत्यादी कवीता सादर केल्या. वैभव चव्हाण,रुक्मिणी कदम,महेश झिरपे,वैभव पवार,प्रथमेश मंडलीक, ओमकार मराठे, उत्तम ठाकूर,साक्षी महाडिक,माधुरी कोळी, अच्युत वाकडे यांनी देखील यावेळी विविध विषयांवर कवीता सादर केल्या. कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर यांनी केले. दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक वाकडे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई