शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइनच्या लसीचा जिल्ह्यात तुटवडा

By admin | Updated: July 6, 2017 06:21 IST

जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने १६ जणांचा बळी गेलेला असतांनाही जिल्हा आरोग्य यंत्रणा मात्र निद्रीस्त असल्याचे पालकमंत्री एकनाथ

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने १६ जणांचा बळी गेलेला असतांनाही जिल्हा आरोग्य यंत्रणा मात्र निद्रीस्त असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिसून आले. जिल्ह्यात औषधांचा साठा भरपूर असला तरी स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याची गंभीर बाब या बैठकीत उघड झाली आहे. त्यामुळे ही लस शासनाकडून उपब्लध होईपर्यंत ती सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी खासगी एजन्सीकडून खरेदी करावी, असे निर्देश शिंदे यांनी बुधवारी एका बैठकीत दिले. गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवासारख्या सणांचा विचार करून वेळीच याबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच स्वाइन फ्लूच नाही तर इतर साथीच्या आजारानी जिल्हा मुक्त राहवा यासाठी आरोग्य विभागास सज्ज राहण्यास त्यांनी सांगितले. स्वाइनच्या नव्या लक्षणांचा विचार करून प्रतिबंधात्मक लस विकसित केली जाते. मात्र या लसींचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले.ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण भागाने वेढलेला आहे. यामध्ये शहरी भागात स्वाइन फ्लूची मोठी लागण झाली आहे. तर ग्रामीण भागात स्वाइनचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार ४३२ जणांची स्वाइन संदर्भात तपासणी केली असून त्यामध्ये २८२ जणांना त्याची लागण झाल्याचा संशय होता. मात्र, त्यातील २४२ जणांना त्याची लागण झाल्याचे समोर आहे. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ महिलांचा समावेश आहे. हे सर्व मृत रुग्ण ठाणे जिल्ह्यातील आहेत. तसेच त्या व्यतिरिक्त जिल्हातील तिघांचा मुंबईत मृत्यू झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा १६ वर गेला आहे.आतापर्यंत स्वाइन फ्लू मुक्त असलेल्या भिवंडी, उल्हासनगर या पालिकेच्या हद्दीतही त्याचे रुग्ण आढळले आहेत. भिवंडीत ३ तर उल्हासनगरात १ रुग्ण आढळल्याची माहिती या बैठकीत त्या-त्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. तर ग्रामीण भागात स्वाइनचे तीन रुग्ण आढळले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत हे निळजे आणि आजदे येथील असून तिसरा रुग्ण हा मुरबाड येथील असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.तपासणी केंद्रे पुरेशीठाणे जिल्ह्यात १३३ तपासणी (स्क्रि निंग) केंद्रे असून सर्व पालिकांमध्ये मिळून ५९ खाटा आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. त्यातील २६ खाटा आयसीयूमध्ये, तर ६० व्हेंटिलेटर व्यवस्थेच्या आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था, मुंबईतील हाफकिन, कस्तुरबा रु ग्णालयात तसेच ठाण्यातील इन्फेक्सन या खासगी प्रयोगशाळेत संशयित रु ग्णांच्या घशातील द्रव चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांमध्ये इतर आजारांचे रुग्णस्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब तसेच आदी आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. एका मृताचे वय पाच वर्षाचेआहे.तर १६-४५ वयोगटातील ३, ४६-६० मधील ५ आणि ६० पुढील ४ रुग्ण असल्याचेआरोग्य विभागाने सांगितले. तसेच आतापर्यंत स्वाइनचे रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून येत होते. यंदा मात्र ते जून महिन्यांपासून आढळून येत असून या बदलेल्या पॅटर्नचाही आरोग्य यंत्रणा अभ्यास करीत आहे.201467,083रु ग्ण तपासले - दोघे संशयास्पद. मृत्यू नाही.20152,87,677रु ग्ण तपासले - दोघे संशयास्पद. मृत्यू नाही. रु ग्ण तपासले - १ हजार ५६२ संशयास्पद. मृत्यू ५८20162,70,529रु ग्ण तपासले- १ संशयास्पद, मृत्यू नाही 2017१ लाख ८० हजार रु ग्ण तपासले- २८० संशयास्पद, १९ मृत्यू