शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:32 IST

कोरोनाचा परिणाम : नागरिकांत आरोग्याविषयी वाढली जागरुकता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, अशातच दरवर्षी पावसाळ्यात व उन्हाळ्याच्या कालावधीत उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनासोबतच डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यामध्ये डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण कमी आढळले आहेत. कोरोनामुळे नागरिकांत आलेल्या जागरूकतेमुळे त्यात मोलाची साथ लाभत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे. अशातच नागरिकांनीदेखील या आजाराचा धसका घेऊन स्वच्छतेवर दिलेला भर दिल्याचे दिसून आहे. त्यात कोरोना संसर्गाबरोबर आरोग्य विभागाने यंदाच्या वर्षी डेंग्यू, मलेरिया या रोगांवरही नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परिणामी, यंदा या रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ३०५ आणि डेंग्यूचे २११ रुग्ण आढळले होते, तर ऑक्टोबर महिन्यात या रुग्णसंख्येत घट झाली असून मलेरियाचे २१२ आणि १७७ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. अंबरनाथ, बदलापूर शहरांत सप्टेंबर महिन्यात ३८४ रुग्ण मलेरियाचे आणि तीन रुग्ण डेंग्यूचे आढळले होते. ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे ३६५ रुग्ण आणि डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यंदा काेरोनाला नियंत्रणात आणताना आरोग्य विभागाला डेंग्यू आणि मलेरियाची साथ रोखण्यास यश मिळाले आहे.यासंदर्भात ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना विचारले असता, कोरोना विषाणूच्या भीतीमुळे नागरिक कमालीचे सावध झाले असून खबरदारी म्हणून ते स्वतःच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेत असल्यामुळेच यंदा डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय घट झाली आहे.

लेप्टोचेही रुग्ण आढळलेजिल्ह्यात शहरी भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट होत असली, तरी ग्रामीण भागात मात्र डेंग्यू आणि मलेरियासोबतच लेप्टोच्या आजाराने डोके वर काढले आहे. मुरबाडमध्ये मागील काही दिवसांंत सहा जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, शहापूर तालुक्यात १० जणांना डेंग्यू, दोन जणांना लेप्टो तर दोन मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्णआजार     सप्टेंबर     ऑक्टोबरडेंग्यू     २१५     १७९मलेरिया     ६८९     ५७७

टॅग्स :thaneठाणेdengueडेंग्यू