शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

डेकोरेटिव्ह घरगुती पणत्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:59 IST

नव्याने आले अ‍ॅक्रेलिकचे मोर; मोत्यांचे झुंबर वेधताहेत लक्ष

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : यंदा ठाणेकरांची घरे डेकोरेटिव्ह पणत्यांनी उजळणार आहे. घरगुती वस्तूंपासून तयार केलेल्या आकर्षक पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. अ‍ॅक्रेलिक मोराची पणती नव्याने आली असून मोत्यांचे झुंबरदेखील ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. हे झुंबर कंदील म्हणून वापरता येतात.सध्या डेकोरेटिव्ह पणत्यांचा बोलबाला आहे. मोत्यांचे झुंबर १२०० रुपयांप्रमाणे आहे. एलईडी कंदीलही वेगळ्या प्रकारात पाहायला मिळत असून याची किंमत ६०० रुपये आहे. सीडी, बांगडी, केकच्या बेसला असलेली डीश, स्पंज वापरून डेकोरेटिव्ह पणत्या तयार करण्यात आल्या आहेत.पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्याही विविध आकारांत, रंगांत आल्या आहेत. फ्लोटिंग कुंदन कॅण्डल्स तसेच मेणाच्या पणत्यांमध्ये गुलाब, बदक, शेवंती, कमळ आदी प्रकार उपलब्ध असून दिवा म्हणून वापरण्यात येणारे मोत्यांचे कलश पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे बोरोसिलिकेटच्या पणत्या, सिल्व्हर कोटेड दिवेदेखील उपलब्ध आहेत. पणत्यांबरोबर घर सजवण्यासाठी मोत्यांची तोरणे, हॅण्डमेड लटकन, प्लास्टिकची झेंडूची फुले, माळा, डायनिंग टेबलवर ठेवण्याची डेकोरेटिव्ह प्लेट, अ‍ॅक्रेलिक व एमडीएफ लाकडाच्या व मोतीने सजवलेल्या रांगोळ्या, दिवाळीसाठी खास कॅन्व्हॉसची तोरणेदेखील आली असल्याचे वैशाली जांब्रे यांनी लोकमतला सांगितले.डेकोरेटिव्ह पणत्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे. यंदा मी नव्याने अ‍ॅक्रेलिक मोर पणती तयार केली आहे. या कामात माझे पती जयंत जांब्रे यांचे मोलाचे सहकार्य मिळते. - वैशाली जांब्रे

टॅग्स :Diwaliदिवाळीthaneठाणे