शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेत राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:45 IST

फोटो पायाखाली तुडवला : भाजप नगरसेवकांचा धिंगाणा

उल्हासनगर : महापालिकेत सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच महासभेत, सोमवारी भाजप नगरसेवकांनी धिंगाणा घालत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यांचा फोटो पायदळी तुडवत, सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महासभा सुरू होताच भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. नगरसेवकांनी गांधी यांचा फोटो झळकवत, तो पायदळीही तुडवला. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर, वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव भाजपने मंजूर केला. याप्रकरणी राहुल गांधी यांची निंदा करणाऱ्या ठरावावर भाजप सोडून सर्व पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले.सिंधीबांधवांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी शांतिप्रकाश आश्रम, साई वसनसाई दरबार तसेच हिराघाट येथील थायरा सिंग दरबार आदींना तीर्थस्थळाचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रशासकीय ठरावानुसार मनीष हिवरे व नितेश रंगानी यांना सहायक उपायुक्त म्हणून पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली. शिक्षण मंडळाची रेनकोट देण्याची निविदा यावेळी रद्द करण्यात आली.शिवसेनेचे स्वप्नील बागुल व कुलवंतसिंग सहातो यांनी पालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांची उपायुक्तपदी नियुक्त करण्याचा ठराव आणला होता. या ठरावाला मंजुरी देण्यात आली.

जुन्याच महासभेचेचालले कामकाजयापूर्वीच्या स्थगित झालेल्या महासभेचे कामकाज सायंकाळपर्यंत सुरू होते. महासभेचे नियमित विषय सायंकाळपर्यंत चर्चेला आले नाही. आता डिसेंबर महिन्याच्या शेवटी महापौर महासभा बोलावण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपचे संख्याबळ जास्त असताना ओमी समर्थक नगरसेवकांमुळे शिवसेनेचा महापौर, तर रिपाइंचा उपमहापौर निवडून आला आहे.मूलभूत समस्यांचा विसरशहरात पाणीटंचाई, रस्ते दुरवस्था, साफसफाई, आरोग्य, मालमत्ताकर विभागातील अनियमितता, नगरविकास विभागाचे काम ठप्प, शहर विकासकामे, आरोग्य, अवैध बांधकामे, राज्य शासन अध्यादेशाद्वारे बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला अल्पप्रतिसाद आदी मूलभूत विषयांचा बहुंताश नगरसेवकांना विसर पडल्याचे चित्र यानिमित्ताने महासभेत निर्माण झाले होते.