शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीसाठी २५ हजार देण्याचा ‘ति’चा निर्णय

By admin | Updated: June 3, 2016 01:56 IST

टीसी असल्याची बतावणी करून १६ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारी व्यक्ती हा प्रकार घडला तेथे सीसीटीव्ही नसल्याने नेमकी कोण आहे

ठाणे : टीसी असल्याची बतावणी करून १६ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारी व्यक्ती हा प्रकार घडला तेथे सीसीटीव्ही नसल्याने नेमकी कोण आहे, त्याचा उलगडा झाला नसल्याने असाच प्रकार अन्य कोणत्याही तरुणी किंवा महिलेच्या बाबतीत घडू नये, यासाठी त्या तरुणीने तिच्या शिक्षणासाठी ठेवलेली एफडी मोडून २५ हजार रुपये सीसीटीव्ही बसवण्याकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणीचा हा निर्णय म्हणजे रेल्वे प्रशासनाला दिलेली चपराक असून आता तरी रेल्वे आणि महापालिका प्रशासनाचे डोळे उघडतील का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.बदलापूर येथील १६ वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री ठाण्यातून क्लास सुटल्यावर घरी जात होती. याचदरम्यान, सॅटीसवरील तिकीट घराजवळून रेल्वे पुलावर येताच तोतया टीसीने तिच्याकडे तिकिटाची विचारणा केली. तिने रेल्वे पास दाखवला. मात्र, तरीसुद्धा तुम्हाला मोठ्या साहेबांकडे यावे लागेल, असे सांगून त्याने तिचा हात पकडला आणि स्थानकाबाहेर खेचत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याच्या हाताला हिसका देऊन त्याच्या तावडीतून पळ काढला. हा झालेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने हा प्रकार करणारा मोकाट असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारी कुणाची, याबाबत पीडितेच्या पालकांनी रेल्वे आणि ठामपा प्रशासनाकडे विचारणा केल्यावर दोघांनी जबाबदारी झटकली. कॅमेरा नसल्यामुळे आपल्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली, ती इतरांच्या बाबतीत घडू शकते, हे लक्षात आल्यावर तिने तिच्या शिक्षणासाठी पालकांनी केलेली २५ हजारांची एफडी मोडली आणि ती रक्कम दिली.