शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सभापतींकडून सुविधांचा त्याग अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्णय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:02 IST

केडीएमटी उपक्रमात सध्या ५६९ कर्मचारी, तर उपक्रमाच्या ताफ्यात २१८ बस आहेत

कल्याण : एकीकडे पद म्हटले की, प्रतिष्ठा आली. त्यात पदाधिकाºयांच्या दिमतीला वाहनचालक, सुरक्षारक्षक आणि शिपाई असतात. पद आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. मात्र, केडीएमटीचे सभापती मनोज चौधरी यांनी परिवहन उपक्रमाची दयनीय अवस्था पाहता त्यांना दिलेल्या सुविधांचा त्याग केला आहे. कर्मचाºयांची कमतरता भेडसावत असल्याने चौधरी यांनी त्यांना दिलेला सुरक्षारक्षक, वाहनचालक आणि शिपाई यांना गणेशघाट आगारात कर्तव्यावर पाठविले आहे.

केडीएमटी उपक्रमात सध्या ५६९ कर्मचारी, तर उपक्रमाच्या ताफ्यात २१८ बस आहेत. परंतु, वाहक आणि चालकांची कमतरता तसेच देखभाल दुरुस्तीअभावी यातील केवळ ७० बस रस्त्यावर धावत आहेत. याचा परिणाम उपक्रमाच्या उत्पन्नावरही झाला आहे. नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या सभेत घटलेल्या उत्पन्नावरून अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले होते. वार्षिक देखभाल दुरुस्ती कंत्राटाचे (एएमसी) तीन कोटी रुपयांचे बिल केडीएमटीकडून थकल्याने हे कंत्राट बंद करण्यात आले. कंत्राटदाराच्या नोटिशीनंतर समितीनेही कंत्राट बंद करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. एएमसी बंद झाल्याने ३२ चालकांची भासणारी उणीव पाहता जे चालक, वाहक, लिपिक, सुरक्षारक्षकासह अन्य विभागांत काम करत असतील, त्यांनी मूळ पदाचे चालक, वाहकाचे काम करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशा कर्मचाºयांना तत्काळ सूचना द्या, असे आदेश नोव्हेंबरमध्ये झालेल्या परिवहन समितीच्या सभेत प्रशासनाला दिले गेले होते. परंतु, त्याप्रमाणे आजवर कृती झालेली नाही. परिणामी, कर्मचाºयांची भेडसावणारी कमतरता पाहता चौधरी यांनीच आता त्यांना दिलेल्या सुविधांचा त्याग करत सुरक्षारक्षक, वाहनचालक व शिपाई यांना आगारात पाठविले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मंगळवारी सायंकाळी परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके यांना दिले आहे. त्यानुसार, बुधवारपासून संबंधित कर्मचारी गणेशघाट आगारात कार्यरत असल्याचे चौधरी म्हणाले.‘ते’ बोध घेणार का?सभापतींच्या कृतीतून कामचुकार आणि दांडीबहाद्दर कर्मचारी काही बोध घेणार का? अशीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. सभापतींच्या निर्णयासंदर्भात उपक्रमाचे व्यवस्थापक खोडके यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका