शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 03:10 IST

महाराष्ट्रासह गोवा राज्यातील १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड

ठाणे : चित्रपटात तसेच मालिकांमध्ये भूिमका साकारण्याचे काम मिळवून देण्याच्या नावाखाली उदयोन्मुख कलाकार आणि त्यांच्या पालकांची फसवणूक करणाऱ्या संदीप व्हरांबळे उर्फ संदीप पाटील उर्फ सँडी (३२, रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याने महाराष्ट्रासह गोवा राज्यातील १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले.डोंबिवलीतील रहिवाशी रवींद्र कुलकर्णी यांचा मुलगा अद्वैतला काम मिळवून देतो, असे सांगत त्याचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी ११ हजार रुपये द्यावे लागतील, असे संदीपने सांगितले होते. कुलकर्णी यांना त्याने स्वत:च्या बँक खात्याचा क्रमांक देऊन त्या खात्यावर ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ते जमा केल्यावर पोर्टफोलिओ दिला नाही. तसेच त्यास काम मिळवून दिले नाही. शिवाय, त्यांचे ११ हजार रुपयेदेखील परत केले नाहीत. याप्रकरणी कुलकर्णी यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्याकडे तक्रार केली.हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडे सोपविले. पोलीस उपायुक्त दीपक देवराज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे , पोलीस उपनिरीक्षक भूषण शिंदे यांनी केलेल्या चौकशीमध्ये कुलकर्णी यांच्याप्रमाणे संदीप याने आणखीही काही जणांची अशाच प्रकारे चार लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्याला ५ ऑगस्ट रोजी घोडबंदर रोड, कासारवडवली येथील ‘रोझा गार्डन’ या इमारतीमधील त्याच्या घरातून अटक केली.मालिकांचे प्रलोभनआतापर्यंत त्याने सुमारे १५० उदयोन्मुख कलाकारांची सुमारे १५ लाखांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे. आधी पालकांना विश्वासात घेऊन मुलांना काम टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याचे तो प्रलोभन दाखवायचा. चित्रपटात मुलाला काम मिळेल, या आशेपोटी पालकही त्याला पैसे देत होते.

टॅग्स :fraudधोकेबाजी