शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पाणथळ जागेवर डेब्रिजचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:44 IST

आठ हजार मेट्रिक टन डेब्रिज : जिल्हा प्रशासनास नोटीस

ठाणे : कासारवडवली भागातील तब्बल ६० एकरांच्या जागेवर मागील तीन महिन्यांपासून डेब्रिजचा भराव टाकला जात होता. ठाण्यातील पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांच्या पाठपुराव्यानंतर पाणथळ नियंत्रण समितीने दिलेल्या अहवालानंतर ज्या ठिकाणी भराव टाकला जात होता, ती जागा पाणथळ असल्याचे उघड झाले. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका या डेब्रिजमाफियांवर कारवाई करणार की नाही, याबाबत जोशी यांनी थेट जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

कासारवडवली येथील महापालिकेच्या ट्रॅफिक पार्कच्या पाठीमागील बाजूस असलेल्या राममारुती रोड येथील ६० एकरांच्या जागेवर भराव टाकला जात असल्याचे जोशी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जानेवारी महिन्यात पाणथळ समितीचे अध्यक्ष असलेले तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या समितीने या जागेची पाहणी करून एक अहवाल तयार केला. त्यानुसार, या ठिकाणी मागील तीन ते चार महिन्यांत तब्बल आठ हजार मेट्रिक टन डेब्रिज टाकल्याची माहिती समोर आली होती. तसेच समितीच्या वतीने अविनाश भगत आणि सीमा हर्डीकर या तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. यात त्यांना कोंब डक जातीचा बदक आढळला होता. जो केवळ पाणथळ जागेवरच आढळतो. तसेच जोशी यांनासुद्धा या जागेचे २०१७, २०१८ आणि २०१९ चे छायाचित्र उपलब्ध झाले होते. त्यानुसार, ही जागा पाणथळ असल्याचे शिक्कामोर्तब झाले.कन्स्ट्रक्शन - डिमॉलिशन वेस्ट धोरण कागदावरचमधल्या काळात डेब्रिज साहित्यावर कारवाईचे अधिकार महापालिकेला असतात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार, पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली असता, त्यांनी कन्स्ट्रक्शन्स अ‍ॅण्ड डिमोलेशन वेस्ट या धोरणाची अंमलबजावणीच झाली नसल्याची बाब समोर आली.वास्तविक २०१७ मध्ये या धोरणाची अंमलबजावणी अपेक्षित होती. या घटनेनंतर तडकाफडकी हे धोरण तयार केले. कारवाई मात्र अद्यापही झालेली नाही. आता यासंदर्भात जिल्हाधिकारी प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावून ही जागा जशी होती, तशीच करावी, अशी जोशी यांची मागणी आहे. अन्यथा, न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.