शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

ठाणे जिल्ह्यात वीजेच्या धक्याने दोघांचा मृत्य; धरणातील पाणी साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 16:55 IST

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही ...

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी.१७१ मिमी. सर्वाधिक पाऊस बारवी धरणात

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही उल्हासनगरमधील मार्केटमध्ये पाणी साचले. जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पडल्याची नोंद झाली असून धरणांच्या पाणी साठ्यात दीड ते सव्वा दोन टक्केने वाढ झाली आहे.       येथील पश्चिमेकडील शिरोर पाडा येथे वीजेच्या तारावर झाडाची फांदी पडली. त्याव्दारे वीजेचा धक्का बसून नागेश मलअप्पा निरंगे (४६) यांचा मृत्यू झाला. या प्रकारची दुर्घटना आंबरनाथ रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात झाडाच्या फांदीमुळे वीजेचा धक्का लागून स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षातील चालक विश्न नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. तर येथील कामगार नाक्याजवळी इंदिरा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यात रात्री झाड पडल्याची घटना घउली. या दुर्दैवी घटने व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे.        जिल्ह्यात एक हजार ३३६ मिमी पाऊस पउला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी. तर या खालोखाल कल्याणला २३८ मिमी, ठाणेला २२८, उल्हासनगरला २०८, अंबरनाथला १८७, शहापूरला १७० मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात ५५ मिमी पाऊस पडला. आहे.जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पाऊस मागील २४ तासात पडल्याची नोंद करण्यात आली आहे.याप्रमाणेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.        भातसा धरणात १७० मिमी. तर मोडकसागरमध्ये ११९, तानसात १२७ मिमी पाऊस पडला आहे. याप्रमाणेच बारवी धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाल्याचे आढळून आले. या धरणात रात्रभरात सब्बा दोन टक्के पाणी साठा वाढला असून तो आता १५.२० टक्के आहे. या धरणात १७१ मिमी. सर्वाधिक पाऊस पडला. या बारवी धरणातील पाणलोटक्षत्रापैकी खानीवरे परिसरात १६२ मिमी, कानहोल परिसरात १६१ मिमी. पाटगाव क्षेत्रात १८४ आणि ठाकूरवाडी परिसरात १३१ मिमी पाऊस या पाणलोट क्षेत्रात पडल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेdam tourismधरण पर्यटन