शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उड्डाणपुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:21 IST

घातपात की आत्महत्या? : मृत्यूबाबत गूढ वाढले

ठाणे : गोल्डन डाईजनाका ते कॅसलमीलकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरून पडून सुमारे ४५ ते ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वा. च्या सुमारास घडली. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. मात्र, हा घातपात, अपघात की आत्महत्या आहे, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू होती.

अगदी अलिकडेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उद्घाटन झालेल्या नव्या कोºया कॅसलमील उड्डाणपुलावरून ४ जून रोजी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही मध्यमवयीन व्यक्ती अचानक खाली कोसळली. चालत्या दुचाकीवरून तो कोसळल्याचा सुरुवातीला अंदाज व्यक्त होत होता.

मात्र, राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी पुलावर साधे घसरल्याचे एकही निशाण नव्हते, की कोणतेही वाहन वर किंवा खाली कोसळलेले नव्हते. त्यामुळे या व्यक्तीने खाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांनी सांगितले. अंगात आकाशी रंगाचा शर्ट, पांढरे बनेल आणि राखाडी रंगाची फूल पॅन्ट असलेली ही व्यक्ती डोक्यावर पडल्यामुळे डोक्याच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे खाली कोसळताच त्याचा अवघ्या काही वेळातच जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती.

तर्कवितर्कांना ऊत, सीसीटीव्ही फुटेजची तपासणीराबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून उड्डाणपुलावर कोणतेही वाहन न आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. अपघात झाला असेल तर वाहन नाही. किंवा दुसºया एखाद्या वाहनावरुन तो कोसळल्यानंतर ते वाहन निघून गेले असावे. किंवा कोणीतरी वरुनच त्याला ढकलून दिले असावे, असे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. जवळपासच्या दुकान आणि इमारतींचेही सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याआधीही एक मृत्यूचार महिन्यांपूर्वी गोकूळनगर येथून खोपट एसटी स्टॅन्ड आणि जेल तलावाच्या दिशेने जाणाºया या कॅसलमील उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. उद्घाटनानंतर २४ तासातच भरधाव वेगाने जाणाºया मोटारसायकलस्वाराचा या पुलावर मृत्यू झाला होता. मंगळवारी सकाळी या पुलावरून स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे चौकात ही व्यक्ती खाली कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.