शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आकाशपाळण्यातून पडून मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:59 IST

ईदच्या दिवशीच घडली दुर्घटना : कुटुंबावर शोककळा

भिवंडी : रमजान ईदनिमित्त शहरातील समदनगरमध्ये भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत आकाशपाळण्यातून पडून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ऐन ईदच्या दिवशी ही घटना घडल्याने मुलीच्या कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली.मुस्कान मोहम्मद शमीम सिद्दीकी (वय ९) हे मृत मुलीचे नाव असून ती कापतलाव जैतुनपुरा या भागात आईवडिलांसोबत राहत होती. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुस्कान आपल्या चुलत बहिणीसोबत समदनगर येथील खेळण्यांच्या जत्रेत गेली. तेथे हाताने फिरवल्या जाणाऱ्या छोट्या आकाशपाळण्यात ती बसली. पाळणा फिरताना वर गेल्यानंतर जीव घाबरून तिचा तोल गेला. ती खाली पडत असताना पाळण्याच्या खांबावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात ती पडली. ही घटना घडल्यानंतर पाळणा चालवणाºया चालकाने तेथून पलायन केले.

मुस्कानच्या कुटुंबीयांनी जखमी मुस्कानला स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाशपाळणा फिरवणाºया चालकाने तत्काळ मुलीला वैद्यकीय मदत दिली असती, तर ती बचावली असती. पाळणाचालकाच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिद्दीकी यांनी केला आहे.

मुस्कानच्या दुर्दैवी मृत्यूबाबत शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कसून चौकशी करत असून तपासाअंती पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कोकाटे यांनी दिली.