शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात २७ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 20:54 IST

घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी मेडोज’ या उच्चभ्रू वसाहतीमधील इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून पडून ज्योती शर्मा (१६) या तरुणीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. हा अपघात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले.

ठाणे, दि. 2 - घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी मेडोज’ या उच्चभ्रू वसाहतीमधील इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून पडून ज्योती शर्मा (१६) या तरुणीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. हा अपघात आहे की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले.ज्योती मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या बेडरूममध्ये एकटीच होती. बाल्कनीत टाकलेला टॉवेल घेण्यासाठी ती वाकली असताना पाय घसरल्याने ती खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा जबाब तिच्या आई आणि बहिणीने नोंदवला. याच जबाबानंतर चितळसर पोलिसांनी तिच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. दरम्यान, ती कोसळल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, कुटुंबीयांच्या जबाबानंतर तिचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले. अर्थात, अपघात की आत्महत्या, अशा दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली. बारावीमध्ये शिकणारी ज्योती वर्गातही हुशार होती. २७ व्या मजल्यावरील मृत्यूची दुसरी घटना कापूरबावडी परिसरातच एक महिन्यापूर्वी अनिवासी भारतीय महिलेनेही २७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आपल्या आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने तिच्या अंत्यसंस्कारापूर्वीच आपलीही जीवनयात्रा तिने संपवली होती. पहिली घटना आत्महत्येची, तर दुसरी घटना अपघातस्वरूपाची असली तरी दुर्दैवाने दोन्ही घटनांमध्ये मृत्यू हा २७ व्या मजल्यावरून पडूनच झाला आहे.