मुंब्रा : रेतीबंदर परिसरातील रस्त्यावर शनिवारी सकाळी झालेल्या आपघातात फैजान नाचिलकर या तरुणाचा मृत्यू झाला. तो ठाण्यातील महागिरी परिसरात राहत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो आणि त्याचा मित्र जावेद मुंब्रा येथून मच्छीचा घाऊक व्यवसाय करून दुचाकीवरून घरी चालले होते. ते रेतीबंदर परिसरातील रस्त्यावरून मार्गक्रम करत असताना दुचाकीला टेम्पो ओव्हरटेक करत होता. त्यापासून वाचण्यासाठी त्यानी दुचाकी डाव्या बाजूला वळवली असता दुचाकीचे संतुलन बिघडल्याने ते दोघे बाजूने चाललेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. यात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी फैजानचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
दुचाकीचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:35 IST