शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब नॅशनल बँकेने वेळेत पैसे न दिल्याने ग्राहकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:35 IST

त्यांचे पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते असून त्यात २७ हजार रूपये जमा आहेत.

उल्हासनगर : पंजाब नॅशनल बँकेने वेळेत पैसे न दिल्याने उपचाराअभावी बुधवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आणि त्या निषेधार्थ नातेवाईकांनी मृतदेह बँकेत नेत गोंधळ घातला. त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.विठ्ठलवाडी परिसरात गणेश पांडुरंग कांबळे कुटुंबासमवेत राहतात. काही महिन्यांपासून आजारी असलेल्या गणेश यांच्यावर केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. आठ वर्षापूर्वी पत्नी त्यांना सोडून गेली असून एकुलता मुलगा, आई-वडिलांसोबत ते राहत होते. त्यांचे पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते असून त्यात २७ हजार रूपये जमा आहेत. उपचारासाठी पैशाची गरज असल्याने, त्यांनी बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक कारणे दाखवून त्यांना पैसे नाकारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.बचत खात्यात पैसे असूनही ते वेळेत न मिळाल्याने त्यांचा उपचाराविना मृत्यू झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत असून बँकेवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. नातेवाईकांनी शववाहिनीतून गणेश यांचा मृतदेह बँकेत आणल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर नातेवाईकांची समजूत काढल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याबाबत पंजाब नॅशनल बँकेकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. बॅकेतील गोंधळानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनीही बँकेत धाव घेतली होती.

टॅग्स :thaneठाणे