लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : खोणी ग्रामपंचायतीतील अक्रम मस्जिद रस्त्यावरून मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन मुलांच्या अंगावर टेम्पो गेल्याने झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. तर दोघांपैकी एक मुलगी गंभीर जखमी असून दुसऱ्या मुलावर उपचार सुरू आहेत. मोहम्मद आरमान मुश्ताक शेख (९) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून सारा शेख (८) ही गंभीर जखमी झाली आहे. तर हंगाला शेख (९) हिच्यावर उपचार सुरू आहेत. हे तिघे खाडीपार खोणी येथील अक्रम मस्जिद येथील मदरसामध्ये नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी जात असताना नियंत्रण सुटलेला टेम्पो त्यांना धडकून रस्त्याजवळ लोखंडी दरवाजावर जाऊन आपटला. या अपघातात तिन्ही मुले दबली गेली. त्यापैकी मोहम्मद आरमान याचा जागीच मृत्यू झाला. या टेम्पोतून पाण्याचे जार घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून त्याने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर मुलांना चिरडले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. टेम्पोचालक मेहंदी हसन नूर याला पोलिसांनी अटक केली आहे.
टेम्पोने चिरडल्याने एका मुलाचा मृत्यू
By admin | Updated: July 7, 2017 06:28 IST