शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचा अपघाती मृत्यू, एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:28 IST

विजयनगर परिसरात राहणाऱ्या तन्मय चव्हाण आणि मयूर काळे या दोघा तरुणांचा नवी मुंबईतील सानपाडा येथे रविवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला.

कल्याण : येथील पूर्वेकडील विजयनगर परिसरात राहणाऱ्या तन्मय चव्हाण आणि मयूर काळे या दोघा तरुणांचा नवी मुंबईतील सानपाडा येथे रविवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने विजयनगरवर शोककळा पसरली आहे. दुसºया एका घटनेत पूर्वेकडीलच चिंचपाडा भागात राहणाºया मंगेश शिर्के याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होते.तन्मय चव्हाण हा अशोकवन, तर मयूर काळे हा मयूरेश सोसायटीत राहायचा. दोघेही नुकतेच पदवीधर झाले होते. शनिवारी रात्री हे दोघेही मित्र मोटारसायकलवरून सानपाडा येथे फिरायला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या गाडीला सानपाड्यातच टेम्पोची जोरदार धडक बसली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्याची माहिती मिळते. अपघाताचे वृत्त सकाळी विजयनगर परिसरात येताच एकच शोककळा पसरली. स्थानिक नगरसेविका माधुरी काळे आणि प्रशांत काळे यांनी दोघांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. दोघांच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.या दोघांवर रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विठ्ठलवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्र, आप्तेष्ट मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.>गळफास घेऊन आत्महत्याशनिवारी रात्री चिंचपाडा गावात राहणाºया मंगेश वामन शिर्के या विवाहित तरुणाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.