शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक सासू दिन, एक दिवस सासूचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:02 IST

सासू आणि सून हे नाते आई, बहिण, मावशी किंवा आजी यासारखे जन्मापासून जुळणारे नाते नाही.

- महापौर मीनाक्षी शिंदेसासू आणि सून हे नाते आई, बहिण, मावशी किंवा आजी यासारखे जन्मापासून जुळणारे नाते नाही. लग्नगाठ बांधली गेल्यावर हे नाते जुळते. सासू-सून या नात्याने अनेक कथा, कादंबºया, नाटक, चित्रपट यांना मसाला पुरवला आहे. सध्या छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये सासू-सून यांची जुगलबंदी तरी पाहायला मिळते किंवा ऋणानुबंध अनुभवायला मिळतात. त्यामुळे हे नाते वजा केले तर आपली करमणूक इंडस्ट्री कोसळून पडेल इतकी ताकद या नातेसंबंधात आहे. ‘जागतिक सासू दिना’निमित्त दोन सूनांनी आपल्या सासवांशी असलेल्या नातेसंबंधांचे उलगडलेले पदर...आपण आपल्या आई सोबत जसे वागतो तसेच आपण आपल्या सासू सोबत वागलो तर आई-मुलीचे नाते असते तसेच नाते सासु आणि सुनेचे होऊ शकेल. सुदैवाने मी स्वत:ला भाग्यवान समजते की मला अगदी आईसारख्या सासुबाई मिळाल्या आहेत. त्यांना तीन मुले असतांनाही त्या आपल्या सुनांना मुलींसारखाच जीव लावतात. त्यामुळेच आज माझ्या नगरसेवक ते महापौरपदापर्यंतच्या प्रवासात त्यांचा माझ्या दृष्टीने खूप मोठा व मोलाचा वाटा आहे.माझ्या लग्नाला आज २२ वर्षे झाली आहेत. परंतु आजही माझे आणि माझ्या सासूचे नाते दृढ आहे. माझा प्रेमविवाह असल्याने आम्ही लग्नानंतर वेगळे राहू लागलो. परंतु वेगळे राहत असतांना देखील माझ्या आणि सासुच्या नात्यात कधीच कटुता आलेली नाही. उलट त्या आजही माझी आणि माझ्या मुलांची काळजी घेत असतात. आज मी महापौर झाले असले तरी त्याचा जास्तीत जास्त आनंद त्यांना झालेला आहे. किंबहुना त्यांना याचा सार्थ अभिमान वाटतो. नगरसेविका झाल्यापासून कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे मुलांकडे कोण बघणार, त्यांचे जेवणाचे काय होणार, याचा विचार मला कधीच करावा लागलेला नाही. कारण माझ्या सासुबाई नेहमीच माझ्या दोन्ही मुलींची काळजी घेत असतात. त्यांना सकाळी नाश्त्यापासून ते शाळेत सोडण्यापर्यंत जवळ जवळ सर्वच कामे त्या करीत असतात. माझी देखील आपल्या मुलीसारखी काळजी त्या करीत असतात. महापौर झाल्यावर माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे जेवणाच्या वेळा आणि घरी जाण्याच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. या धावपळीत आपल्या तब्येतीची काळजी घे, असे म्हणणाºया माझ्या सासुबाईच आहेत. मला त्यांच्याकडून आणखी काम करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन नेहमीच मिळत असते. काही दिवसांपूर्वी दगदगीमुळे आजारी पडले तेव्हा त्या रुग्णालयात माझी काळजी घेण्यासाठी दिवस-रात्र हजर होत्या. आपल्या कामाच्या व्यापातून आपल्या मुलांवर संस्कार करणे गरजेचे असते. ते काम मला जमत नाही. परंतु, मी निश्चिंत आहे, कारण मला माझ्या सासुबाईंवर पूर्ण विश्वास आहे. त्या मुलांवर चांगले संस्कार करतील, याची पक्की खात्री आहे. आपल्या मुलांबरोबर, सुनांची आणि नातवंडाची काळजी कशी घ्यावी, त्यांना खायला काय हवे, काय नको, याची सर्वच माहिती त्यांना आहे. शिवाय माझ्या सुखात आणि दु:खात त्या नेहमी माझ्या सोबत सतत असतात.आता समाज बदलतो आहे, एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन, विभक्त कुटुंबपध्दतीकडे लोकांचा कल राहिला आहे. परंतु माझ्या मते घरात एक तरी ज्येष्ठ व्यक्ती असावी. त्यांच्यामुळे आपल्यावर चांगले संस्कार घडतात. भांडणे कोणाच्या घरी होत नाहीत, घरोघरी मातीची चुली असतातच. परंतु आपण कसे वागावे हे आपल्या हातात असते. आपण जर आपल्या सासुला आईचे स्थान दिले आणि सासुने देखील सुनेला मुलीसारखे मानले तर मला वाटते की, भांड्याला भांडे लागणारच नाही.- शब्दांकन : अजित मांडके