शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी धोकादायक असलेल्या ‘त्या’ नाल्याचे काम पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:26 IST

पावसाळ्यात रेल्वेरूळ खचण्याची भीती असल्याने चिखलोलीतील नाल्याचे काम रविवारी मेगाब्लॉक घेऊन रेल्वेने पूर्ण केले.

बदलापूर : पावसाळ्यात रेल्वेरूळ खचण्याची भीती असल्याने चिखलोलीतील नाल्याचे काम रविवारी मेगाब्लॉक घेऊन रेल्वेने पूर्ण केले. या काळात जवळपास सहा तास वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान रेल्वे रुळाची दुरुस्ती, चिखलोली येथे रूळांखालील नाल्याचे काम, विठ्ठलवाडी-उल्हासनगरदरम्यान अन्य कामे करण्यासाठी कल्याण ते बदलापूरदरम्यानची वाहतूक या काळात पूर्ण बंद होती. चिखलोली गावाजवळ रेल्वे रुळाखालून जुना नाला गेला होता. तो अरूंध असल्याने पावसाळ्यात पाणी वाहून नेण्यास तो अपुरा ठरत होता. त्यामुळे रेल्वे रुळाच्या शेजारी पाणी साठून रहात होते. त्यामुळे भविष्यात रेल्वे रुळ खचण्याची, प्रसंगी मार्ग वाहून जाण्याची भीती असल्याने रेल्वे प्रशासनाने हा नाला मोठा करण्याचे काम हाती घेतले होते. नाल्याचे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून आधीच मोठे आरसीसी ब्लॉक तयार केले होते. रूळांखाली खोदकाम करून ते ब्लॉक टाकणे, नंतर माती टाकून ती जागा पूर्ववत करणे आणि रूळ टाकून मार्ग तयार करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हे काम सकाळी १० वाजता सुरु करण्यात आले. नाल्याच्या कामामुळे येथे यंदाच्या पावसाळ््यात पाणी तुंबणार नाही.रेल्वे रुळाखाली नाला तयार करण्याचा प्रयत्न गेल्यावर्षी सप्टेंबरमध्येही करण्यात आला. मात्र, पावसाचे दिवस असल्याने, माती खचत असल्याने तेथे महाकाय क्रेन नेणे आणि खड्डा खणून नाल्याचे ब्लॉक बसवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने हे काम एप्रिल महिन्यात करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.>आठवडाभर वाहतूक धीमीच : चिखलोलीच्या नाल्याचे काम झाले असले तरी तेथून जाणाºया गाड्यांना किमान आठवडाभर तरी वेगाची मर्यादा पाळावी लागेल. त्यामुळे कर्जत मार्गावरील लोकलच्या वाहतुकीला या काळात विलंब होण्याची शक्यता आहे.