शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारती स्ट्रक्चरल ऑडिटविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 00:27 IST

संरचनात्मक अभियंतापद रिक्त : जीव मुठीत घेऊन राहत आहेत नागरिक

सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिकेने १५० पेक्षा जास्त धोकादायक इमारती जाहीर केल्या असून संरचनात्मक अभियंताविना इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट रखडले आहे. हजारो नागरिक अशा इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत. धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर २० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे महापालिकेने सुचविले. तसेच आॅडिट करण्यासाठी नाखवा नावाच्या संस्थेची निवड केली. मात्र, किती जुन्या व धोकादायक इमारतींचे आॅडिट झाले, आदींची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, शहरातील २००५ पूर्वीची बेकायदा बांधकामे व धोकादायक इमारती सरकारी अध्यादेशानुसार नियमित करण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने कोरोनापूर्वी नगररचनाकार विभागात केली. मात्र, त्यापैकी बहुतांश अधिकाऱ्यांनी महापालिकेत येणे पसंत केले नाही. बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेसाठी तंत्र समितीसह कंत्राटी पद्धतीने एका संरचनात्मक अभियंता यांची नियुक्ती केली होती. मात्र, शहरातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून धोकादायक इमारतींचे आॅडिट झाले नसल्याचे उघड झाले आहे. शहरातील धोकादायक इमारतींचे आॅडिट करण्यासाठी संरचनात्मक अभियंता यांची आवश्यकता आहे. तसेच महापालिका नगररचना विभागाने बहुतांश शहरातील संरचनात्मक अभियंता यांच्या परवान्याचे नूतनीकरण वर्षानुवर्षे केले नसल्याने बांधकाम परवानगी, बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया व धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट रखडले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी व नवनियुक्त नगररचनाकार अरुण गुडगुडे यांच्या निर्णयाकडे शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.अभियंत्याच्या परवान्याचे नूतनीकरण करामहापालिका नगररचनाकार विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी नगररचनाकार न मिळाल्याने विभागाचे काम ठप्प झाले होते. अरुण गुडगुडे यांच्या रूपाने नगररचनाकार मिळाल्याने, एका संरचनात्मक अभियंत्याची नियुक्ती करून शहरातील संरचनात्मक अभियंत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केल्यास शहर विकासाला चालना मिळेल, अशी माहिती प्रसिद्ध वास्तुविशारद अतुल कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे