शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:51 IST

खाद्याच्या किमती गगनाला : लाखो रुपयांच्या म्हशी कवडीमोल भावात विकल्या

वसंत पानसरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हवली : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र, म्हशींच्या वाढत्या किमती, अपुरे मनुष्यबळ तसेच त्यांना लागणारे पशुखाद्याचे वाढलेले भाव आणि दुधाला पाहिजे तेवढा भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात निराशा आली आहे.

अमुल दूध उत्पादक संघाने सरकारी अनुदानावर डेअरीच्या माध्यमातून शहापूर तालुक्यात डोळखांब, शहापूर, नडगाव, किन्हवलीसारख्या ग्रामीण भागात दूध संकलन केंद्र उभारले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. यामुळे येथील बºयाच शेतकºयांनी कर्जाऊ म्हैस घेऊन उदरनिर्वाह म्हणून दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय निवडला. सुरुवातीला दुधाचे आणि खाद्याचे दर यामध्ये मेळ बसत असल्याने उत्पादकांना ते फायदेशीर पडत होते. मात्र, त्यानंतर अमुलने केलेली दरकपात, गगनाला भिडलेले खाद्याचे दर, विजेचे वाढते दर, वाढती मजुरी, औषधोपचारासाठी लागणारा खर्च, दूध संकलन केंद्रावर कमी भावात होणारी दुधाची खरेदी, खाद्य, मजुरी तसेच इतर खर्च परवडत नसल्याने बहुतेक उत्पादकांनी तोटा सहन करत ८० ते ९० हजार रु पयांत आणलेल्या म्हशी २५ ते ३० हजारांत विकून टाकल्या.

शेतीसोबतच जोडधंदा म्हणून अनेक उत्पादकांनी लाखो रु पये खर्च करून हरियाणा, गुजरात आणि इतर काही राज्यांमधून म्हशींची आयात केली. शेती नसेल तेव्हा या उद्योगाचा उपयोग होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, सद्य:परिस्थितीत अनेक दूध उत्पादकांना हा व्यवसाय करताना आर्थिक त्रास होत आहे. लाखो रु पये खर्चून दुभती जनावरे घेऊनही काहींना व्यवसाय बंद करावा लागला, तर काहींनी कमी नफ्यात कसातरी व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायासाठी संबंधितांना खाद्य, चाराव्यवस्था, विजेची व्यवस्था, दूधकाढणी यंत्र अशा अनेक गोष्टींमध्ये गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे उत्पादक व्यवसाय पूर्णपणे बंद करू शकत नाही.

मात्र, सध्याच्या परिस्थितीत मिळेल त्या किमतीत समाधान मानण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. तरीही, याला फाटा देत बहुतेक उत्पादकांनी शेकडोंच्या संख्येने आणलेल्या म्हशी विकून टाकल्या आहेत. भावघसरणीमुळे अनेक उत्पादक हे डेअरीमध्ये दुधाची विक्र ी न करता शहरात वैयक्तिक घरोघरी फिरून दुधाची विक्र ी करतात. त्याठिकाणी शेतकºयांना म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रु पये प्रतिलीटर, तर गायीच्या दुधाला ४० ते ५० रु. प्रतिलीटर असा भाव मिळतो. तेच दूध डेअरीमध्ये विक्र ीस नेल्यास पाच रु पये ६० पैसे फॅट या दराने ३० ते ३५ रु. भाव मिळतो. म्हशीच्या एक लीटर दुधामागे खाद्य, चारा, मजुरी, वीजबिल असे घटक पकडून ३३ ते ३५ रु पये खर्च येत असतो.पौष्टिक खाद्याकडे ठेवावे लागते विशेष लक्षदूध उत्पादक शेतकºयांना जनावरांच्या पौष्टिक खाद्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. मात्र, हे खाद्य महाग असल्याने तिथेही शेतकºयांचे हाल होतात. म्हशींना लागणारी सरकी तीन हजार रुपये क्विंटल, भुसा १८००, चुनी दोन हजार ४० ते २४०० रुपये, चनाचुनी २३००, मका २४००, पत्रीपेंड साडेचार हजार या दराने मिळते. सहा महिन्यांपूर्वी या खाद्याच्या किमती ८०० ते १००० रु पये क्विंटल दराने स्वस्त होत्या. 

दुग्ध व्यवसायात वाढ करण्यासाठी आमच्या विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन केले जाते. तसेच आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जाईल. आम्हाला वरिष्ठस्तरावरून जे आदेश येतात, त्यानुसार आम्ही काम करत असतो.- ए.ए. पावरा, पशुधन विकास अधिकारी