शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांमुळे घटणार गोविंदा पथकांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:26 IST

दहीहंडी उत्सवातील आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे उत्सव साजरा करणाºया आयोजकांची संख्या यंदा आणखी कमी होण्याची भीती सध्या गोविंदा पथकांना भेडसावते आहे

ठाणे : दहीहंडी उत्सवातील आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे उत्सव साजरा करणाºया आयोजकांची संख्या यंदा आणखी कमी होण्याची भीती सध्या गोविंदा पथकांना भेडसावते आहे. भविष्यात ही संख्या कमी कमी होत गेल्यास दहीकाला उत्सव साजरा करण्याची परंपरा लयास जाईल, अशी चिंता गोविंदा पथकांना सतावत असल्याचे ठाण्यातील दहीहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी सांगितले.दहीहंडी उत्सवात न्यायालयाने आणलेल्या १८ वर्षांच्या मर्यादेची बंदी आणि २० फुटापर्यंतच्या उंचीच्या निर्बंधाबाबत १ आॅगस्टला निर्णय होणार आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने गोविंदा पथकांविरोधात निर्णय दिल्यास सरकार अध्यादेश काढून गोविंदा पथकांच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास गोविंदा पथकांना वाटतो. परंतु गोविंदा पथकांवरील अटी-निर्बंध शिथील झाले आणि आयोजकांवरील अटी कायम राहिल्यास छोट्या प्रमाणात उत्सव आयोजन करणाºयांची संख्या नगण्य होईल. याचा अर्थातच परिणाम पथकांच्या सहभागावरही होण्याची शक्यता आहे. गोविंदा पथकांवर २०१४ साली आलेल्या निर्बंधांपासून पथकांची संख्या कमी होत चालली आहे. आता ठाण्यात २०० गोविंदा पथक सहभागी होतात. तसेच, छोट्या प्रमाणात उत्सव साजरा करणारे आयोजक १०० ते १५० च्या आसपास आहेत.सुरक्षा, आवाजाची मर्यादा यांसारख्या विविध अटींमुळे आयोजकांवर आलेल्या बंधनांमुळे हंडीच्या आयोजनाचे प्रमाण कमी होईल, असे समन्वय समितीचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने जवळपास ४० टक्के आयोजक बॅकफूटवर गेले होते. यंदाही त्यांच्यावरील अटी कायम राहिल्या, तर अनेक छोटे आयोजक उत्सवाचे आयोजन करणार नाहीत, असे महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पारंपरिक उत्सव साजरा करा!जशी गोविंदा पथकांवर आलेल्या अटींमुळे पथकांची संख्या कमी होत आहे तशीच आयोजकांवर आलेल्या निर्बंधामुळे छोट्या प्रमाणात आयोजन करणाºयांची संख्याही कमी होत असल्याची नाराजी गोविंदा पथकांनी व्यक्त केली. बक्षिसाच्या रकमेसाठी गोविंदा पथके उत्सवात सहभागी होत असतात, असे सामान्यांना वाटत असते. पण याच रकमेतून आम्ही वर्षभर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित असतो, याकडे पेंढारे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे छोट्या आयोजकांनी मागे न हटता किमान पारंपरिक पद्धतीने उत्सवाचे आयोजन तरी करावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.