शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Dahi Handi 2022 : ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू

By अजित मांडके | Updated: August 20, 2022 15:33 IST

Dahi Handi 2022 : जखमी गोविंदापैकी ५२ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.  

ठाणे - दोन वर्षानंतर मोठय़ा जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या दहीहांडी उत्सवात हंडी फोडतांना तब्बल ६४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील ५२ वर्षीय गोविंदावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर अन्य ११ रुग्णांवर कळवा व जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदापैकी ५२ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.      यंदा दहीहांडीचा जोष मोठय़ा दिमाखात पाहावयास मिळाला. ठाण्यातील हंडी फोडण्यासाठी मुंबई, नवीमुंबई, ठाणो आदी भागातून हजारो गोंविदा शुक्रवारी ठाण्यात दाखल झाले होते. मात्र थर रचताना काही गोविदांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यानुसार तब्बल ६४ गोविंदा दहीहांडीचे थर रचतांना खाली पडून जखमी झाल्याचे दिसून आले. यातील नौपाडा येथे राहणारे संतोष शिंदे (५२) हे प्रभात सिनेमा येथे हंडीचे थर लावतांना पडले होते. ते बेशुध्द झाल्याने त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

सुरज पारकर (३८) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय नितीन चव्हाण (१६), शैलेश पाठक (३२), शितलू तिवारी (२५), साहिल जोगळे (१५), आनंद रानु (०५), सनी गुरव (१२), बालाजी पाटील (३०), जाहीद शेख (२०) यांच्यावर कळवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण 64 गोविंदापैकी १२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ५२ जणांवर प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, ठाणे महानगपालिकेच्या वतीने  ठाणे शहरातील मुख्य आठ दहीहंडीच्या ठिकाणांपैकी चार ठिकाणी चार वैद्यकीय पथके कार्यरत ठेवली होती व उर्वरीत चार ठिकाणी एक वैद्यकीय पथक फिरते ठेवले होते. त्यानुसार दुर्घटनाग्रस्त गोविंदांना प्रथमोपचार देऊन सोडून दिले आहे. 

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीthaneठाणे