शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू जनता बँकेचे एनपीए २९ टक्के

By admin | Updated: August 9, 2016 02:10 IST

बँके चे एनपीए २९ टक्के आहे. रिकव्हरी हा बॅकेचा आत्मा असून थकबाकीदारांशी चर्चा करुन सामोपचाराने वसुली करू, असे धोरण दि डहाणू रोड जनता को.आॅप. बँकेचे अध्यक्ष राजेश

डहाणू : बँके चे एनपीए २९ टक्के आहे. रिकव्हरी हा बॅकेचा आत्मा असून थकबाकीदारांशी चर्चा करुन सामोपचाराने वसुली करू, असे धोरण दि डहाणू रोड जनता को.आॅप. बँकेचे अध्यक्ष राजेश पारेख यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले . याशिवाय बँकेच्या सभासदांसाठी काही सुविधा असून हृदयविकार, मूत्रपिंडाचा विकार, कर्करोग, मेजर ब्रेन सर्जरी यासारख्या आजारांसाठी बँकेच्या निधीतून २५ हजार रु. पयांपर्यंतची वैद्यकीय मदत देण्यात येईल, अशी माहिती दिली. बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.रमेश नहार, सदस्य मिहीर शहा, उपस्थित होते. यावेळी सुवर्ण तारण कर्जात बँकेची फसवणूक टाळण्यासाठी दोन सुवर्णकारांकडून सोन्याची तपासणी व मूल्यमापन करण्याचे तसेच व्यवसाय कर्ज योजनेला प्रोत्साहन देण्याचे नव्या संचालक मंडळाने जाहीर केले. बँकेची पात सुधारण्यासाठी नव्या संचालक मंडळाचा भर असल्याचे माजी नगराध्यक्ष आणि संचालक मिहीर शहा यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एकूण रक्कमेच्या ६५ टक्के रक्कम कर्ज म्हणून द्यावयाचे असते मात्र मागील बँकेच्या संचालक मंडळाने ५० टक्के कर्ज वाटप केल्याने बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब समोर आणली. सध्या डहाणू पूर्व, चारोटी, वाणगाव अशा बँकेच्या शाखा असून आणखी शाखा वाढविण्याचा विचार आहे. अशी माहिती देण्यात आली. सध्या सुमारे ३०० कर्जदारांकडे ४० कोटींची थक बाकी आहे. तसेच बँकेचे एनपीए २९ टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले. १४ आॅगस्ट, २०१६ पासून रविवारीही २ लाखापर्यंत एनईएफटी/आरटीजीसची सुविधाही सुरु करणार असल्याचे तसेच दिवाळीपासून एटीएमची सुविधासुरु करण्याचे आश्वासन दिले . चारोटी येथे असलेली बँकेची शाखा लवकरच कासा येथे हलविण्यात येणार आहे, तसेच कामगारांसाठी असलेली पीएफची सुविधा सुरळीत करणार असल्याची माहिती पारेख यांनी यावेळी दिली. बॅकेच्या सर्वसाधारण सभासद पाल्याला एस.एस.सी. परिक्षेत ८० टक्के गुण ,इ.१२ वी विज्ञान शाखेत ८५ गुण तसेच कॉमर्स, आर्टस शाखेत ६५ टक्के गुण संपादन केल्यास त्याला मागासवर्गीय पाल्यांनी अनुक्र मे ७५ टक्के, ७० टक्के व ६० टक्के असे गुण मिळविल्यास त्यांना पुरस्कृत केले जाईल. तसेच त्याने कोणत्याही शाखेतून इंजिनियरिंगमधून डिप्लोमा केल्यास बक्षीस दिले जाईल असे सांगितले.(वार्ताहर)