शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दरोडे, जबरी चोऱ्या करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 02:52 IST

भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमावर चॉपरने हल्ला करून त्याने सात लाख ४० हजार रुपये लुटले होते.

ठाणे : सोने-चांदीची किंवा रोख रकमेची वाहतूक करणाºयांवर पाळत ठेवून त्यांना लुटणाºया टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. कोल्हापूर आणि भिवंडीमधील सात आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांनी २५ गुन्ह्यांची कबुली दिली.वेगवेगळ्या आस्थापनांच्या रोख रकमेची वाहतूक कुणाकडून आणि कुठून केली जाते, याची तपशीलवार माहिती काढून त्यांना लुटण्याचे गुन्हे भिवंडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी भागात घडले आहेत. अशा पद्धतीचे गुन्हे करणारे काही आरोपी भिवंडीतील ब्रह्मानंदनगरात वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या भिवंडी युनिटचे पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. पाटील यांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी विजय नायर या आरोपीस ताब्यात घेतले. मोटारसायकलस्वारांना मारहाण करून त्यांना लुटल्याच्या गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमावर चॉपरने हल्ला करून त्याने सात लाख ४० हजार रुपये लुटले होते. त्याच्या टोळीत आठ आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी इचलकरंजी येथून तीन तर भिवंडी येथून चार आरोपींना अटक केली. या टोळीतील एका सदस्याचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक मकरंद रानडे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.आरोपींनी भिवंडी, इचलकरंजी येथे सात दरोडे, तीन जबरी चोºया आणि एक मारहाणीचा गुन्हा केला आहे. आरोपींकडून जुन्या एक हजार रुपयांच्या ३७ नोटा, २८ हजार रुपयांच्या नवीन नोटा आणि लॅपटॉप असा एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य कारवाईत पोलिसांनी एका सराईत सोनसाखळीचोरास अटक करून १४ गुन्हे उघडकीस आणले. हुज्जुअली यासरअली जाफरी हे आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील इराणीपाड्यात राहतो. त्याच्याकडून सहा लाख ९० हजार ४४० रुपयांचे दागिने हस्तगत केले. २५ गुन्ह्यांची उकल करून आठ लाख १५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.