शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडे, जबरी चोऱ्या करणारी टोळी भिवंडीतून गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:12 IST

सोने-चांदीची किंवा रोख रकमेची वाहतूक करणा-यांवर पाळत ठेवून त्यांना लुटणाºया टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केले

ठाणे : सोने-चांदीची किंवा रोख रकमेची वाहतूक करणा-यांवर पाळत ठेवून त्यांना लुटणाºया टोळीला ठाणे पोलिसांनी जेरबंद केले. कोल्हापूर आणि भिवंडीमधील सात आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांनी २५ गुन्ह्यांची कबुली दिली.वेगवेगळ्या आस्थापनांच्या रोख रकमेची वाहतूक कुणाकडून आणि कुठून केली जाते, याची तपशीलवार माहिती काढून त्यांना लुटण्याचे गुन्हे भिवंडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी भागात घडले आहेत. अशा पद्धतीचे गुन्हे करणारे काही आरोपी भिवंडीतील ब्रह्मानंदनगरात वास्तव्यास असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या भिवंडी युनिटचे पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. पाटील यांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी विजय नायर या आरोपीस ताब्यात घेतले. मोटारसायकलस्वारांना मारहाण करून त्यांना लुटल्याच्या गुन्ह्यांची कबुली त्याने दिली.भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमावर चॉपरने हल्ला करून त्याने सात लाख ४० हजार रुपये लुटले होते. त्याच्या टोळीत आठ आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार, पोलिसांनी इचलकरंजी येथून तीन तर भिवंडी येथून चार आरोपींना अटक केली. या टोळीतील एका सदस्याचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक मकरंद रानडे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक त्रिमुखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.आरोपींनी भिवंडी, इचलकरंजी येथे सात दरोडे, तीन जबरी चोºया आणि एक मारहाणीचा गुन्हा केला आहे. आरोपींकडून जुन्या एक हजार रुपयांच्या ३७ नोटा, २८ हजार रुपयांच्या नवीन नोटा आणि लॅपटॉप असा एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य कारवाईत पोलिसांनी एका सराईत सोनसाखळीचोरास अटक करून १४ गुन्हे उघडकीस आणले. हुज्जुअली यासरअली जाफरी हे आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील इराणीपाड्यात राहतो.त्याच्याकडून सहा लाख ९० हजार ४४० रुपयांचे दागिने हस्तगत केले. २५ गुन्ह्यांची उकल करून आठ लाख १५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.