शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानातील कामगारांकडून घेतली झाडे कापून

By admin | Updated: June 30, 2017 02:43 IST

पावसाळ््यात झाडे उन्मळून पडतात. वास्तविक ती बाजूला करण्यासाठी किंवा ती छाटण्यासाठी अग्निशमन दलाचा वापर केला पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : पावसाळ््यात झाडे उन्मळून पडतात. वास्तविक ती बाजूला करण्यासाठी किंवा ती छाटण्यासाठी अग्निशमन दलाचा वापर केला पाहिजे. मात्र भिवंडीत उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांकडून ती कापून घेतली जातात. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले नसतानाही त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात. दोन कामगारांना अंपगत्व आले. यामुळे झाड छाटणीसाठी स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी केली जात आहे. मागील रविवारी वऱ्हाळादेवी टाकीजवळ झाड छाटताना पाचशे किलोचा लोखंडी पाईप उद्यान विभागातील कामगारांच्या अंगावर आला होता. प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी झाली नाही. वास्तविक या कामगारांना झाडे छाटण्याचे प्रशिक्षण दिले नसल्याने हा प्रसंग ओढवला. प्रशिक्षण दिले असते तरी कामगारांनी साधनांशिवाय ही कामे केली नसती अशी पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. कधीकधी नगरसेवक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सोसायटीची खाजगी झाडे देखील उद्यान विभागाकडून विनामूल्य काढून घेतात. वास्तविक वीजेच्या तारांमधील झाडे, नैसर्गिक आपत्तीमधील झाडे तोडण्यासाठी लागणाऱ्या शिडीसह, रबरी हातमोजे व इतर वस्तू बहुतांशी अग्निशमन दलाकडे उपलब्ध असतात. अशावेळी अग्निशमन दलास टाळून आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी धोकादायक कामे उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपवतात. त्यामुळे भविष्यात उद्यान विभागातील कामगारांच्या जीवावर बेतल्यास जबाबदार कोण,असा प्रश्न विचारत पालिकेतील एका कामगार संघटनेने अशी कामे उद्यान विभागातील अप्रशिक्षीत कामगारांकडून करून घेऊ नये अशी मागणी केली आहे.बुधवारी नागाव कादरिया मस्जिदजवळ पावसाने वाकलेले जुने झाड काढण्यासाठी उद्यान विभागास सांगितले. मात्र रहिवाशांचे नुकसान न करता झाड सुरक्षित कापून त्याची विल्हेवाट लावण्याची साधने उद्यान विभागाकडे नसल्याचे उद्यान अधिक्षक एन.एन.संख्ये यांनी सांगितले.