ठाणे : आपण ठाणे जनता सहकारी बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एका भामट्याने नौपाड्यातील ४५ वर्षीय खातेदाराची १६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान २००८ च्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाड्यातील यशोदीप सोसायटीतील रहिवासी हे १० फेब्रुवारीला सकाळी त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी भामट्याने संपर्क साधून आपण ठाणे जनता सहकारी बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. डेबिटकार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून या खातेदाराकडून डेबिटकार्डचा क्रमांक आणि सीव्हीसी क्रमांक घेतला. त्यानंतर, मात्र या भामट्याने खातेदाराच्या परस्पर १६ हजारांची रोकड बँक खात्यातून काढून घेतली. आपल्या खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचे निदर्शनास येताच त्यांनी याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
बँकेच्या नावे फोन करून ग्राहकाची आॅनलाइन फसवणूक
By admin | Updated: February 13, 2017 05:03 IST