शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:25 IST

वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

कल्याण : वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना निवेदन देऊन ग्राहकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. थकबाकी असल्यास वीज पुरवठा खंडीत केला जातो हे मान्य आहे. परंतु, चालू बिलाची अंतिम तारीख उलटताच वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याची कारवाई चुकीची असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे. मार्च अखेरीच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा प्रताप सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.महावितरणच्या एजन्सीमार्फत वाटप केली जाणारी वीज बिले वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही ग्राहक करतात. बिल अंतिम तारखेला अथवा दोन-तीन दिवस आधी मिळते. एखादे बील वेळेत नाही भरले तर वीज कर्मचारी वीज खंडीत करण्याची यादी घेऊन दारात येतात आणि कधी कधी ग्राहक घरी नसताना देखील त्यांचा वीज पुरवठा खंडीत करून जातात. याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे थकीत बिलावर वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईच्या आधी १५ दिवसांची नोटीस ग्राहकांना देणे बंधनकारक आहे पण तसे होताना दिसत नाही. महावितरणकडून काहीवेळा चुकीच्या रिडींगची भरमसाठी बिले ग्राहकांना पाठविली जातात. त्यात दुरूस्ती करावी, यासाठी ग्राहकांकडून अर्ज केले जातात. परंतु, दुरूस्ती वेळेत होत नसल्याने ग्राहकाचे नाव वीज थकबाकी यादीत येते. त्याचा नाहक त्रास ग्राहकाला सोसावा लागत असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे.बिल दुरूस्ती होईपर्यंत संबंधित बिलावर ‘नो डिस्कनेक्ट’ असा शिक्का मारून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वीज बिलावर मराठीमधील नाव आणि पत्ता चुकीचा लिहिला जातो, याबाबत विचारणा केली असता मराठी शब्द दुरूस्ती सॉफ्टवेअर आमच्याकडे नाही असे उत्तर मिळत असल्याकडेही दळवी यांनी लक्ष वेधले आहे.