शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

म्हसा गावात जमावबंदी केली लागू; यात्रेवर कोरोनाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:05 IST

व्रत पूजन म्हणून मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या हस्ते म्हसोबाची पहाटे पूजा करण्यात आली, तर नागरिकांनी यात्रेला येऊ नये, म्हसा गाव परिसरात गर्दी करू नये

मुरबाड : महाराष्ट्रातील प्रसिध्द म्हसा यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरुवात होते. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापन समितीने बैठक घेऊन यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला. परंतु भाविक राज्यभरातून दर्शनासाठी गर्दी करतील व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, यामुळे ग्रामपंचायतीने पोलिसांना पत्र देऊन यात्रा परिसरात जमावबंदी लागू करण्याची मागणी केली होती. ती मान्य करून २५ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू केली असली तरी दर्शनासाठी भाविकांची तुरळक गर्दी झाली होती.

म्हसा यात्रा म्हटली की, महाराष्ट्रासह शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. स्थानिकांबरोबरच व्यापारीवर्गासाठी ही यात्रा म्हणजे सुगीचे दिवस असतात. गुरांचा बाजार हे या यात्रेचे आकर्षण असते. अगदी टोपल्या, घोंगड्यांपासून विविध प्रकारच्या मिठाई, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लागलेले असतात. लहान मुलांसाठी मनोरंजन, विविध खेळ येथे असतात. शनिवारी, रविवारी तर येथे चालायला जागा नसते इतकी गर्दी होते. अनेकजण खासगी वाहनातून येत असल्याने येथे कोंडी होते. तसेच यात्रेच्या काळात मुरबाड आगारातून एस. टी.ची खास व्यवस्था केली जाते. पण यंदा कोरोनामुळे यात्राच न भरविण्याचा निर्णय झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.

दरम्यान, व्रत पूजन म्हणून मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या हस्ते म्हसोबाची पहाटे पूजा करण्यात आली, तर नागरिकांनी यात्रेला येऊ नये, म्हसा गाव परिसरात गर्दी करू नये, यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे जमावबंदी आदेश लागू करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार येथे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

पाेलीस, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरयात्रेत अनुचित प्रकार घडू नये, याकरिता हजारो पोलिसांबरोबरच परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते. यात्रेच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते. कोरोनाचे संकट कमी होत असले तरी धोका नको म्हणून मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ पष्टे व त्यांच्या समितीने निर्णय घेऊन यात्रा होणार नाही, असे जाहीर केले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या