शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यातील जनावरांच्या जीवावर उठली संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:59 IST

चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे.

सुरेश लोखंडे ठाणे : लॉकडाउन काळात लागू केलेल्या संचारबंदीचा गैरफायदा घेऊन रखरखत्या उन्हात चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे. शिवाय या शिकारींच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात जंगलांना वनवे लावून जनावरांचा जीव घेतला जात आहे. शनिवारी सकाळीच दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांनी एक हरणीचा जीव घेतला. तानसा अभयारण्यात घडलेल्या या घटनेसह एकापाठोपाठ तीन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.वटवाघुळातील कोरोनापासून जीव वाचवता यावा, लागण होऊन कोणाचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जंगलातील पशूपक्षांना या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी जंगलात जाण्यासही बंदी आहे. मात्र, या सक्तीच्या संचारबंदीला न जुमानता काहींनी जंगलातील पशूपक्षांच्या शिकारीची मनमानी सुरू केली आहे. शिकार करण्यासाठी जंगलात वणवे ही लावण्याच्या दुर्दैवी घटना जंगलात घडत आहेत.शनिवारी सकाळीच तानसा अभयारण्यात भेकर जातीच्या हरणाची शिकार केल्याची दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेची चाहूल लागताच वनाधिकारी व कर्मचाºयांनी शिकारींना शिताफीने अटक केली.याशिवाय लागोपाठ याच अभयारण्यात अन्यही शिकारीच्या दोन घटना घडल्याच्या वृत्तास वन परीक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी दुजोरा दिला.>लावा पक्ष्याचीही शिकारया हरणाच्या शिकारीतील अटक केलेले आरोपी शहापूर तालुक्यामधील मौजे टहारपूर, डिंभे येथील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी भिवंडीच्या सांगाव, देवचोळे येथील वनक्षेत्रात रानडुकराची शिकार करण्यात आली. या घटनेतील दोघांना ताब्यात घेतले. तर अन्य दहा ते पंधरा साथीदार फरार आहेत. याशिवाय शहापूर तालुक्यामधील उंबरखांड येथे तिघांना अटक केली आहे. तर अन्य तिघे फरार असून त्यांनी चार लावा पक्ष्यांची शिकार केल्याचे उघडकीस आले. या मृत लावा पक्ष्यासह त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य आढळून आले असून ते जप्त केल्याचे चन्ने यांनी सांगितले. या शिकारींच्या घटनांच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वच जंगलात वणव्याच्या घटनांमध्ये वन्यजीव, पशूपक्षी किडेमकोडे आणि औषधी वनस्पती जळून खाक होत आहेत.>माळशेज घाटात आगीच्या सात घटनासध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा काळ स्वरक्षणाचा असल्याचे समजून काही महाभाग जंगलात जाऊन वन्यजीवांची हत्या करून पोटभरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माळशेज घाट परिसरातील जंगलात अद्याप शिकारीची घटना काही दिवसात घडली नाही. परंतु, आगीच्या पाच ते सात घटना घडल्या असून त्या वेळीच आटोक्यात आणल्याचा दावा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी केला आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात शिकारीची व आग लागण्याची घटना घडली नसल्याचा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी केला आहे.