शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सुसंस्कृत डोंबिवली शहराने मला मोठे केले!

By admin | Updated: January 15, 2017 02:41 IST

श्वास चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यालयास भेट दिली. साहित्य संमेलनात आपले कथाकथन ठेवावे, अशी सूचना त्यांनी

डोंबिवली : श्वास चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यालयास भेट दिली. साहित्य संमेलनात आपले कथाकथन ठेवावे, अशी सूचना त्यांनी आयोजन समितीला केली आहे. विविध सूचनांमुळे कार्यक्रमांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात संधी देता आली नाही, तर पुढील वर्षी आगरी महोत्सवात कथाकथनाचा कार्यक्रम घेण्याचा मानस आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी व्यक्त केला आहे. आयोजन समितीने घारपुरे यांचा हृद्य सत्कार केला. तेव्हा, डोंबिवलीने मला मोठे केले, अशी भावना घारपुरे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीच्या मतदारयादीत घारपुरे यांचे नाव नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयोजक आगरी युथ फोरमने घारपुरे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर, रविवारी सायंकाळी घारपुरे यांनी संमेलन कार्यालयास भेट दिली. घारपुरे यांनी सांगितले, आताच्या काळात मी डोंबिवलीत हवे होते. डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि मी ठाणेकर आहे. मात्र, ३६ वर्षे मी डोंबिवलीकर होते. डोंबिवलीने मला मोठे केले. डोंबिवली साहित्य संस्कृतीची पंढरी आहे. या पंढरीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे, ही बाब मला आनंददायी वाटते. डोंबिवलीतील साहित्य व संस्कार फार चांगले आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नक्कीच चांगले आणि यशस्वी होणार, यात दुमत आणि शंका नाही. डोंबिवलीकरांचा सुसंस्कृतपणाचा किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी लतादीदींनी गाणे गायले नाही, म्हणून प्रेक्षक चिडले होते. त्यावेळी दिवंगत शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र वाजपेयी यांनी प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. तेव्हा, संयम दाखवून डोंबिवलीकरांनी सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवले होते. असे अनेक किस्से आहेत. डोंबिवलीत गोविंद तळवलकर, विश्वास मेहेंदळे, वि.दा. करंदीकर असे अनेक दिग्गज्ज वास्तव्यास होते. डोंबिवलीला साहित्य संस्कृतीची परंपरा आहे. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष वझे यांनी सांगितले, डोंबिवलीत ‘श्वास’ नसल्याने आमचा श्वास गुदमरतोय. त्यामुळे घारपुरे यांचे ठाण्याला जाणे मनाला चुकचुक लावणारे ठरले आहे. संमेलनाला त्यांनी उपस्थित राहावे. तो डोंबिवलीकरांचा सन्मानच ठरेल. (प्रतिनिधी)विद्यार्थी संमेलन २१ जानेवारीलासाहित्य संमेलनानिमित्त कल्याणला कार्यक्रम व्हावे, यासाठी साहित्यिकांसोबत आयोजकांची नुकतीच एक बैठक पार पडली होती. कल्याणमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचा विचार पुढे आला होता. २१ जानेवारीला विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचे ठरले आहे. महिला मेळावा १२ डिसेंबरला : साहित्य संमेलनात महिलांचा सहभाग असावा. महिलांचा एक कार्यक्रम असावा. त्यासाठीही नुकतीच एक बैठक पार पडली होती. त्यानुसार, महिला मेळावा १२ डिसेंबरला घेण्याचे ठरले आहे. महिला मेळावा सकाळी १० ते ११.३० या वेळेत पीअ‍ॅण्डटी कॉलनीत, ११.३० ते १२ या वेळेत ब्राह्मण सभागृहात, ३.३० ते ४.३० यावेळेत ओंकार इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात पार पडणार आहे. संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी बदलापुरात २५ व २६ डिसेंबरला कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.