शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

कंटेनरखाली चिरडून पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:44 IST

भिवंडीनजीकची घटना : ओव्हरलोड ट्रकचा पाठलाग करताना घडली दुर्घटना

भिवंडी : वाडा येथील स्टील कंपनीमधून लोखंडी सळया व अँगल भरून वडपा बायपासकडे निघालेल्या ओव्हरलोड ट्रकचा मोटारसायकलने पाठलाग करताना, ट्रकचालकाने गतिरोधकावर जोरदार ब्रेक लावल्याने मोटारसायकल ट्रकवर आदळून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री चाविंद्रा, पोगावफाटा येथे घडली. दादासो रामचंद्र सिंगे (३५, रा.बदलापूर ) हे पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी दादासो सिंगे हे भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असून, ते रात्री गस्तीवर होते. त्यावेळी वडपा बायपासच्या दिशेने लोखंडी सळया व अँगलने भरलेला ट्रक त्यांना दिसल्याने त्यांनी कारवाईसाठी त्या ट्रकचा पाठलाग केला. मात्र ट्रकचालक पळून जात असताना पोगावफाटा येथे गतिरोधकावर त्याने अर्जंट ब्रेक लावला. त्यामुळे ट्रकमधील सळया व अँगल विरु द्ध दिशेने समोरून येणाºया कंटेनरवर आदळले व समोरून येणाºया कंटेनरच्या केबिनमध्येदेखील या सळया व अ‍ँगल घुसले होते. सुदैवाने कंटेनरचालक बचावला. मात्र त्याचदरम्यान दुचाकीने ट्रकचा पाठलाग करणारे दादासो सिंगे हेदेखील लोखंडी एंगलवर जाऊन आदळले. अँगल त्यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तालुका पोलिसांनी ट्रक व कंटेनर ताब्यात घेतला आहे. अपघातातून बचावलेला कंटेनरचालक हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला, तर ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय पंकज घाटकर करीत आहे.भिवंडीत खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा बळीभिवंडी : खड्डा चुकवताना भरधाव दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडून, लेबर कॉन्ट्रॅक्टर जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी मुंबई - नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाच्या हद्दीतील एका पेट्रोलपंपासमोर घडली. सतीश जगन्नाथ साखरे ( ४६, रा.टेमघरपाडा ) हे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.नदीत बुडून तरु णाचा मृत्यूमीरा रोड :काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेना नदीत बुडून दहिसर पूर्वेतील भारवाड चाळीत राहणाºया २४ वर्षीय राहुल राजभर याचा रविवारी मृत्यू झाला. रविवार सुटी असल्याने राहुल हा आपल्या ५ मित्रांसह चेना नदी परिसरात पार्टी करण्यासाठी गेला होता. दारूची पार्टी करून नशेत असलेला राजभर हा नदीत उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.एक्स्प्रेसच्या धडकेत तरु णी ठारवासिंद : एक्स्प्रेसखाली सापडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना येथील रेल्वेस्थानकाजवळ रविवारी घडली. कसारा डाउन ट्रॅकवर ४.४५ वाजता हा अपघात घडला. हा अपघात आहे की आत्महत्या, याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत असल्याचे स्टेशन प्रबंधक यांनी सांगितले.