शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या तीन दिवसांत गर्दी

By admin | Updated: January 31, 2017 03:17 IST

युती तुटली असली आणि दुसरीकडे आघाडी झाली असली तरीदेखील सर्वच पक्षांत बंडखोरी अटळ मानली जात असल्याने अद्यापही शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने

ठाणे : युती तुटली असली आणि दुसरीकडे आघाडी झाली असली तरीदेखील सर्वच पक्षांत बंडखोरी अटळ मानली जात असल्याने अद्यापही शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी उसळणार असल्याचे दिसत आहे. त्यातच निवडणूक विभागामार्फत आॅनलाइन अर्ज मागवले जात असल्याने या चारही पक्षांनी एकाच वेळेस उमेदवारी याद्या जाहीर केल्या, तर मात्र आॅनलाइन प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होऊन परिणामी सर्व्हर डाउन होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरू केल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे यंदा उमेदवारी अर्ज हे आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन्ही स्वरूपांत भरावयाचा असल्याने अनेक उमेदवारांची आधीच भंबेरी उडालेली आहे. त्यात आता चारही प्रमुख पक्षांसह मनसेनेदेखील आपली उमेदवारी यादी जाहीर न केल्याने त्याचा परिणाम आता पुढील तीन दिवसांत दिसून येणार आहे. शिवसेना उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या रात्री यादी जाहीर करणार असून भाजपादेखील २ फेब्रुवारीला यादी जाहीर करणार आहे. लोकशाही आघाडीकडूनदेखील १ किंवा २ तारखेलाच यादी जाहीर होणार आहे. शिवाय, मनसेदेखील १ तारखेला यादी जाहीर करणार आहे. त्यामुळे असे जर झाले, तर आॅनलाइन प्रक्रियेच्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी ताण येणार आहे. अनेक उमेदवार आॅनलाइन पद्धतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणुकीच्या वेबसाइटवर लॉगिन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेकांनी वेबसाइटवर जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लॉगिन केल्यास तीवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी, सर्व्हर डाउन होण्याची भीतीदेखील अनेकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत, निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे यांच्याशी संपर्कसाधला असता ही वेबसाइट निवडणूक आयोगाने तयार केली असून सर्व्हर डाउन होणार नाही, याची खबरदारीदेखील आयोगाने घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी अनेक उमेदवारांमध्ये आॅनलाइनची भीती कायम असून दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांसारखी आमची अवस्था झाली, तर काय करायचे, असा पेच त्यांना सतावत आहे. दरम्यान, यावरदेखील काही पक्षांनी तर्क लढवला असून ज्यांचे तिकीट पक्के आहे, त्यांना आधीच आॅनलाइन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी सांगण्यात आले असून उमेदवारी निश्चित होताच, फार्म अपलोड करून त्याची प्रिंट काढून एबी फॉर्म जोडून त्यावर स्वाक्षरी करून तो अर्ज निवडणूक विभागाकडे देण्याची तयारीदेखील पूर्ण झाल्याचा दावा त्यांच्यातर्फे करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)