शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ईदच्या निमित्ताने बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 23:00 IST

दोन दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपल्याने शहरांतील बाजारात खरेदी करण्यासाठी मुस्लिम कुटूंबीयांची कोटरगेट, मंगळवार बाजार, तिनबत्ती व ठाणारोड या बाजाराच्या ठिकाणी गर्दी उसळली आहे.

भिवंडी : दोन दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपल्याने शहरांतील बाजारात खरेदी करण्यासाठी मुस्लिम कुटूंबीयांची कोटरगेट, मंगळवार बाजार, तिनबत्ती व ठाणारोड या बाजाराच्या ठिकाणी गर्दी उसळली आहे.शहरांत सकाळी ११ वाजल्यापासून खरेदी करण्यास सुरूवात होते ती रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असते. या निमित्ताने चप्पल-बुटापासून कपडे व विविध दागीने खरेदी करतात. यासाठी शहरांत मंगळवारपासून सुरू झालेला बाजार ईदच्या सणापर्यंत सुरू रहाणार आहे. तसेच दररोज इफ्तारीसाठी लागणाऱ्या खाण्याच्या वस्तू व फळे यांचा बाजारही गेले महिनाभर मशिदीच्या बाजूला व ठिकठिकाणी लागलेला होता. ईद निमित्ताने बनविण्यात येणाऱ्या शिरकुरमासाठी लागणारे दुधाचा आजचा भाव ६६ रूपये होता. पुढे तीन दिवसांत हा भाव ७५ ते ८० रूपयांपर्यंत जाईल असा अंदाज रोजेकारांनी व्यक्त केला. सोन्याचा भाव कमी झाल्याचा फायदा उठवून श्रीमंत घरच्या महिलांनी दागिन्यांची खरेदी केली. या सणासाठी मुस्लिम समाजातील गरीबापासून श्रीमंतापर्यंतची कुटुंब घरांत लागणाऱ्या व दैनंदिन वापरात येणाऱ्या सर्व वस्तू आपापल्या ऐपती प्रमाणे खरेदी करीत आहेत. त्यासाठी बाजारात खरेदीदारांची गर्दी उसळली आहे. ही गर्दी येथे चार दिवस रहाणार आहे. ईदचा चाँद दिसल्यानंतर कोटरगेट मशिदच्या परिसरात मोठा बाजार भरतो. तेथे शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक रात्रभर खरेदी करीत असतात. (प्रतिनिधी)