शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनवर आक्षेपांची कोटी कोटी उड्डाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:27 IST

इंधन व बस दुरुस्ती खर्चात ४० टक्के वाढ, ४७० बसवर जाहिरातीपोटी मिळणारे उत्पन्न केवळ १० टक्के मिळणे, विविध विभागांकडून २४ कोटी ८२ लाख ७२ हजार ५६२ रुपयांची थकीत येणी, महसुली तुट जास्तीची दाखविणे, पोलिसांची थकीत येणी यासह तब्बल ४३ गंभीर आक्षेप २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात परिवहन सेवेवर नोंदविण्यात आले आहेत.

ठाणे : इंधन व बस दुरुस्ती खर्चात ४० टक्के वाढ, ४७० बसवर जाहिरातीपोटी मिळणारे उत्पन्न केवळ १० टक्के मिळणे, विविध विभागांकडून २४ कोटी ८२ लाख ७२ हजार ५६२ रुपयांची थकीत येणी, महसुली तुट जास्तीची दाखविणे, पोलिसांची थकीत येणी यासह तब्बल ४३ गंभीर आक्षेप २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात परिवहन सेवेवर नोंदविण्यात आले आहेत. त्यातही १९८८ ते २०१४-१५ पर्यंतच्या ८२१ आक्षेपांचा अद्यापही निपटारा झालेला नसल्याने प्रशासनाचा ढिम्म कारभारही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.मंगळवारी ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. त्यात हे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मागील ८२१ आक्षेपांचाच अद्याप निपटारा झाला नाही. आता नव्या आक्षेपांचा निपटारा होईल का? याबाबत शंका उपस्थित होत आहेत.परिवहन सेवेतील आर्थिक महसुली तूट ही तब्बल २८ कोटी ४१ लाख ३५ हजार १७ रुपये एवढी दाखविली आहे. विविध कारणास्तव ४८ कोटी ७ लाख ४ हजार ७७७ रुपयांची निराकरणाने वसुली झालेली नाही. तर विविध कारणास्तव ३० कोटी ६४ लाख ५ हजार ४९५ रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. अग्रीम रकमांचे समायोजन न झाल्याने ४ कोटी ७९ लाख ७४ हजार ५८ रुपयांची वसुली, दंडाची १९ हजार ६४५ची वसुली शिल्लक, बडतर्फ, राजीनामा व सेवानिवृत्त अधिकारी यांचे नावे असलेल्या अग्रीम रक्कमांचे समायोजन अद्याप झालेले नाही. ती रक्कम सुमारे ४ कोटी ५५ लाख आहे.इंजिन आॅइल घोटाळा,जाहिरात ठेक्यात तोटा.../पान ३>तीन कोटींचे समायोजन न करणाऱ्या कर्मचाºयाचा राजीनामा मंजूरसेवानिवृत्ती निधी प्रशासन हिस्स्यात ३ लाख २९ हजार ३०२ रुपये जादा दर्शविण्यात आले आहेत, सफाई कामगारांचा कमी पुरवठा करूनही ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल झालेली नाही, एका कर्मचाºयाने ३ कोटी रकमेचे समायोजन न करता त्याचा परिवहनने राजीनामा मंजूर केला कसा असा आक्षेपही नोंदविण्यात आला आहे. विना तिकीट प्रवासी व अवैध्य प्रवासी वाहतुकीवर उपाययोजना व अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. परिवहन सेवेत अतिरिक्त असलेल्या चालक व वाहकांबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे.>नादुरुस्तबसची आरटीओकडून पासिंगज्या बसेस नादुरुस्त अवस्थेत आहेत, त्यांची आरटीओकडून पासिंग करून घेणे, ज्या बसेसला नवीन इंजिन आवश्यक होते, त्या बसला ते न बसविता इतर बसेसला कसे बसविणे असे गंभीर आक्षेप यामध्ये नोंदविण्यात आले आहेत. परिवहनच्या सेवेत ३५७ बस असून त्यांचे आरटीओ पासिंग व पीयुसी टेस्टिंग करीता ३२ हजार ८०० रुपये अग्रीम रक्कम घेतली असून तिचे अद्यापही समायोजन केले नसल्याचे नमूद केले आहे. याशिवाय ३० ते ४० टक्के बस या नादुरुस्त असतानासुद्धा त्यांचे आरटीओ पासिंग व पीयुसी टेस्टिंग केल्याची बाब समोर आली आहे.शासन निर्णयानुसार एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ३५ टक्केपर्यंत रक्कम ही आस्थापनेवर खर्च होणे अपेक्षित असताना ८३.५४ टक्के रक्कम ही या कारणासाठी खर्च करून तब्बल ४७ कोटी ९४ लाख ५९ हजारांचा जास्तीचा खर्च झाल्याबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.विक्री झालेल्या तिकिटांच्या रकमेवर प्रवासी कर व बालपोषण अधिकार व त्यावरील २५ टक्के दंडाची म्हणजेच ३४ कोटी १३ लाख २८ हजार ९५३ रुपयांची रक्कम अद्याप शासनाकडे जमाच केलेली नाही.