शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा रेशनिंग दुकानांवर फौजदारी कारवाई, परवानेही निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:47 IST

‘फ’ परिमंडळाचा दणका : नरेश वंजारी यांची माहिती

ठाणे : संचारबंदीच्या कालावधीत अन्नधान्य वितरणात मनमानीपणे अफरातफर केल्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागांमधील सहा शिधावाटप (रेशनिंग) दुकानांवर फौजदारी गुन्ह्यांसह परवाने निलंबनाची धडक कारवाई केल्याची माहिती फ परिमंडळचे उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी सांगितले.शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य सुरळीत व नियमीत मिळावे, यासाठी फ परिमंडळ उपनियंत्रक विभागाने दक्षता घेऊन जिल्ह्यात १३ भरारी पथके तैनात केली. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४४१ रेशिनंग दुकानांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या मनमानीला आळा घातला. त्यापैकी बेजबाबदारपणा, मनमानी व अन्नधान्य वितरणात अफरातफर, धान्याचे कमी वाटप, तर काही पात्र कार्डधारकांना अन्नधान्य न दिल्याच्या कारणाखाली सहा दुकानांवर ही धडक कारवाई केली आहे. यामध्ये अंबरनामधील सर्वाधिक तीन रेशनिंग दुकानांसह ठाणे येथील दोन, भार्इंदर येथील एका रेशिनंग दुकानाचा समावेश आहे.अशी केली ग्राहकांची फसवणूकठाण्याच्या घोडबंदरचे त्रिवेंद्र चंदे यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने अन्नधान्य वितरण केले आहे. तर, ठाणे (पूर्वच्या) ओमसाई स्वयंसहायता बचत गटाने रेशनिंग दुकान ठरवून दिलेल्या वेळेपर्यंत सुरू ठेवले नाही. भार्इंदरच्या अशोक गौड यांनी शिधापत्रिकाधारकांचे १२ क्विंटल गहू त्यांना वितरित केला नाही.ते स्वत:च्या फायद्यासाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. अंबरनाथला बशीर व इस्माईल किडवईकर यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केले आहे. तर, दामाजी गोसर यांनी चणाडाळीची मागणी करण्यास टाळाटाळ केल्यामुळे कार्डधारकांना ती मिळाली नाही. याप्रमाणेच सुनील सांगळे व जुगेशकुमार गुप्ता यांनी नियमानुसार वाटप करण्याऐवजी कमी अन्नधान्य वितरित केल्याची मनमानी केली, आदींवर भरारी पथकांच्या अहवालावरून कडक कारवाई केल्याचे वंजारी यांनी सांगितले.