शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी शर्यतप्रकरणी सेना नगरसेवकावर गुन्हा

By admin | Updated: June 16, 2016 01:00 IST

एरंजाड गावात बेकायदा भरवण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत गोळीबार झाल्याने झोप उडालेल्या पोलिसांनी शर्यत आयोजित केल्याबद्दल सेना नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे.

बदलापूर : एरंजाड गावात बेकायदा भरवण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीत गोळीबार झाल्याने झोप उडालेल्या पोलिसांनी शर्यत आयोजित केल्याबद्दल सेना नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार करणाऱ्यांनाही आधीच अटक झाली आहे. या शर्यतीकडे दुर्लक्ष करून तिला छुपा पाठिंबा देणाऱ्या बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरण शमवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा आभास निर्माण करत आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याची धडपड सुरू केल्याचे उघड झाले.एरंजाड गावात रविवारी बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या. तेथे वादातून एका गटाने दुसऱ्यावर दहशतीसाठी गोळीबार केला होता. गोळीबारामुळे शर्यत प्रकरण चर्चेत आले. बंदी असून शर्यती झाल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित झाला. ज्या गटाने गोळीबार केला होता, त्यातील सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले. गोळीबाराचा तपास एकीकडे सुरू असताना दुसरीकडे पोलिसांनी या शर्यती भरवणाऱ्यांचा शोध सुरू केल्याचा भास निर्माण केला. (प्रतिनिधी)इतरांवर गुन्हे दाखल पण मग पोलिसांचे काय?शर्यती भरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले असले, तरी या प्रकरणाचा तपास ज्या पोलीस ठाण्यात सुरू आहे, त्याच पोलीस ठाण्याचे अधिकारीही या शर्यतीचे भागीदार आहेत. तेथील पोलिसांच्या सहकार्याने आणि आशीर्वादानेच या स्पर्धा भरवल्या जातात. अनेक महिने हा प्रकार सुरू आहे. असे असतानाही पोलीस ठाण्यातील जबाबदार पोलिसांवर मात्र कोणतीच कारवाई झालेली नाही किंवा त्यांची चौकशीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांना या प्रकरणातून वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न पोलीस करीत असल्याचे दिसते.