शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील आदिवासी वस्तीचे पाणी बंद करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 02:09 IST

लॉकडाऊनमुळे थकबाकी न भरणाऱ्या पाणी कमिटीवर कारवाई

भिवंडी : खांबाळा ग्रामपंचायत क्षेत्रातील कुशिवली कातकरी पाडा येथील आदिवासी कुटुंबीयांनी खासगी व्यक्तीकडून केल्या जाणाऱ्या वाढीव पाणीपट्टी वसुलीस विरोध केल्याने आदिवासी पाड्यातील नागरिकांचा व परिसरातील पाणीपुरवठा बंद केल्याने संबंधितांवर सोमवारी रात्री पडघा पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.खांबाळा ग्रामपंचायत हद्दीतील नळपाणीपुरवठा योजनेसाठी तानसा पाइपलाइनवरून नळजोडणी करण्यात आली आहे. या पाणीवापराची पाणीपट्टी ग्रामपंचायत खात्यातून भरणे अभिप्रेत असताना गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या महिलांकडून मासिक शंभर रुपये प्रत्येक घरातून वसूल करून ती पाणीपट्टी परस्पर मुंबई महापालिकेस भरली जात असे. लॉकडाऊन काळात पाणीपट्टी थकल्याने मुंबई महापालिका प्रशासनानें पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस खंबाळा ग्रामपंचायतीस दिली असता गावातील गावदेवी पाणी कमिटीच्या सदस्य महिलांनी गावातून अतिरिक्त पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. आदिवासी कातकरी कुटुंबीयांच्या प्रत्येक घरातून ५०० रुपये अधिक जमा करण्याबाबत तगादा लावला असता आदिवासी कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे या वस्तीचे पाणी तीन दिवस बंद ठेवण्यात आले. याबाबत शुभांगी विश्वास बगले यांनी आम्ही दरमहा मासिक पाणीपट्टी देत असतानाही पाणीपुरवठा खंडित केल्याची तक्रार दिली. पडघा पोलिसांनी गावदेवी पाणी कमिटीच्या महिला जयश्री गजानन ठाकरे, जयश्री पाटील, आशा विठ्ठल मांजे, सविता मांजे, चिऊ पाटील या महिलांविरोधात अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ नुसार ३ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे.करभरणा नाहीअंबाडी परिसरात ग्रामपंचायतमार्फत पाणीपट्टी वसूल न करता स्थानिक महिला मंडळ दरमहा रक्कम वसूल करून ती मुंबई महापालिकेकडे पाणीबिलापोटी भरणा करते. काही खासगी व्यक्ती वसुली करूनही मुंबई पालिकेची पाणीपट्टी थकीत ठेवत असल्याने आदिवासी वस्त्यांना पाणी न मिळण्याची वेळ आली.