शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणसह वीजग्राहकांना गंडवणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

डोंबिवली : वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीजग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे ...

डोंबिवली : वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीजग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करून महावितरणसह संबधित ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला.

साहिल अझगर पटेल (रा. बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी, कल्याण पश्चिम) असे या भामट्याने नाव असून त्याने एकूण २३ ग्राहक व महावितरणची दोन लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल असून, तपासात फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

कल्याण पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड आणि वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक गजानन राठोड यांना साहिल पटेल याने विविध ग्राहकांच्या वीजबिलासाठी दिलेले धनादेश न वटल्याने संशय आला. त्यामुळे संबंधित ग्राहकांना प्रत्यक्ष कार्यालयात बोलावून राठोड यांनी चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. परिमंडल कार्यालयाच्या परिसरातील दोन, तहसील कार्यालयासमोरील एक व शिवाजी चौकातील एक अशा विविध पतसंस्थांच्या चार बिलभरणाकेंद्रात येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून आरोपीने त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली. ती हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीजबिलापोटी स्वतःचा आयसीआयसीआय या रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिलभरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. परंतु, हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्चिम विभाग कार्यालयात परत आल्याने आरोपीचे कारस्थान उघड झाले. उपव्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात साहिल पटेलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मीटर रीडिंग, ग्राहक वर्गवारी अथवा वीजभार यासंदर्भात चुकीची नोंद झाली असेल तरच महावितरणच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडून वीजबिल दुरुस्त केले जाते. इतर कोणालाही वीजबिलात दुरुस्तीचा अधिकार नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही घटकाच्या आमिषाला बळी न पडण्याची दक्षता घ्यावी व फसवणूक टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. अशाच प्रकारच्या फसवणुकीबाबत १५ मार्च रोजी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव (रा. उल्हासनगर कॅम्प-३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांनी कोणत्याही परिस्थितीत वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून ऑनलाइन किंवा महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रातच करून छापील पावती घ्यावी. वीजबिल भरणा करण्याबाबत महावितरणबाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------