शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मीरा - भार्इंदर पालिका उपायुक्तांविरोधात गुन्हा

By admin | Updated: June 27, 2017 03:07 IST

मुर्धा खाडीतील कांदळवनाची तोड तसेच सरकारचा कांदळवन सेल व मनपाने संगनमताने खोटा पंचनामा बनवून उच्च न्यायालयाची

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मुर्धा खाडीतील कांदळवनाची तोड तसेच सरकारचा कांदळवन सेल व मनपाने संगनमताने खोटा पंचनामा बनवून उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने उघडकीस आणला. नालेसफाईच्या नावाखाली मुर्धा किनाऱ्यावरील कांदळवनाच्या सव्वाशे झाडांची कत्तल केल्याप्रकरणी अखेर मीरा- भार्इंदरचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टेंसह ६ ते ८ जणांविरोधात तहसीलदारांच्या निर्देशाने भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मीरा- भार्इंदर महापालिकेने शहरातील खाडी वा उपखाड्या या चक्क नाले असल्याची दिशाभूल करत एकूण १२ नाल्यांमधील २ लाख ८४ हजार चौ.मी. भागातील कांदळवनाची झाडे काढण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. कांदळवन सेल व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच दि बॉम्बे एन्वायरमेंट अ‍ॅक्शन ग्रूपच्या प्रतिनिधींनी अहवाल मागवला होता. मुर्धा खाडी, जाफरी खाडी, कनकिया, नवघर खाडी, घोडबंदर खाडी, भार्इंदर पश्चिम खाडीची पाहणी केली असता पाण्याचा प्रवाह सुरळीत असल्याचे तसेच खाडी व परिसरात कचरा, बेकायदा भराव झाल्याचे आढळले. महापालिकेने न्यायालयास केवळ झाडांची छाटणी केल्याचे सांगितले. तर कांदळवन सेलने फक्त ७ ते ८ झाडेच कापल्याचा पंचनामा पालिकेच्या संगनमताने बनवला. परंतु महसूलने पाहणी केली असता कांदळवनाची लहान-मोठी १२२ झाडे कापलेली आढळली. त्या आधारे तहसीलदार किसन भदाणे यांच्या आदेशाअंती मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची फिर्याद दिली. उपायुक्त डॉ. पानपट्टेंसह विधी अधिकारी सई वडके यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना, आम्हाला उच्च न्यायालयाने झाडे काढायची परवानगी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी पालिकेला पत्र दिले असता त्यात झाडे कापायला किंवा तोडायला परवानगी दिल्याचे नमूदच नव्हते.