शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सीडीसी तयार करणा:या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:23 IST

ठाणे,  दि. ३ - देशविदेशात शिपींग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले सीडीसी (कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट) अर्थात निरंतर निर्वहन प्रमाणपत्र बनावट छापून, त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा ठाणो पोलिसांनी गुरूवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.सीडीसीसारखा महत्वपूर्ण दस्तावेज बनावट तयार करून ...

ठाणे,  दि. ३ - देशविदेशात शिपींग कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अनिवार्य असलेले सीडीसी (कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट) अर्थात निरंतर निर्वहन प्रमाणपत्र बनावट छापून, त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा ठाणो पोलिसांनी गुरूवारी पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून बनावट प्रमाणपत्र तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.सीडीसीसारखा महत्वपूर्ण दस्तावेज बनावट तयार करून तो काही उमेदवारांना विकण्यासाठी एक आरोपी नौपाडय़ातील बी कॅबीन भागात येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून डोंबिवलीतील कोळेगाव येथील अब्दुल्ला मनत्तुमपाडत हकीम, ठाण्यातील वागळे इस्टेटमधील विजयन गोपाल पिल्ले आणि मालाडमधील मालवण येथील अलीम मोहद्दीन मुसा यांना 2 ऑगस्ट रोजी नौपाडय़ातून अटक केली. आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना या टोळीच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली. शिपींग कंपन्यांमध्ये जहाजावर नोकरी करू इच्छिणा:या वेगवेगळय़ा राज्यांमधील उमेदवारांना गळाशी लावून, त्यांचा बायोडाटा हे आरोपी रायगड जिल्ह्यातील पाली येथील प्रदीप उर्फ दिनेश शंकर रौधळ याच्याकडे पाठवायचे. उमेदवारांच्या बायोडाटाच्या आधारे दिनेश रौधळ सीडीसी तयार करायचा. हे सीडीसी साधारणत: एक लाख रुपयात विकले जायचे. दिनेश रौधळ हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून, खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक केली. त्याच्या घरझडतीमध्ये पोलिसांनी सीडीसी तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, कलर प्रिंटर, स्कॅनर, रबरी शिक्के आदी साहित्य हस्तगत केले. याशिवाय काही उमेदवारांचे बायोडाटा, पासपोर्ट आणि पनामा देशाचे बनावट सीडीसीदेखील पोलिसांनी हस्तगत केले. त्याच्याविरूद्ध कुर्ला आणि ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीचे गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पोलीस सहआयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.